शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने ३१ हजार शेतकऱ्यांचे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By विवेक चांदुरकर | Updated: March 7, 2024 15:35 IST

सर्वेक्षणानंतर कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

खामगाव : जिल्ह्यात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २६ व २७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर प्राथमिक अहवालात निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला. खरीप हंगामात कमी पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले. त्यातच कपाशी व सोयाबीनला अल्प भाव आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होत्या. रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी, मका या पिकांची पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या बाधित झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाजित अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २६ व २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, २७ व २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १३९ गावांतील ९२७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सात तालुक्यांत भाजीपाल्याचे नुकसान२६ व २७ फेब्रवारी दरम्यान आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा या तालुक्यांत नुकसान झाले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी ११७ हेक्टरवर नुकसानखामगाव तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी आलेल्या पावसामुळेही नुकसान झाले आहे. यामध्ये १५ गावांत ११७.६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, ज्ञानगंगापूर, वाकूड, कुर्हा, राहूड, पिंप्री देशमुख, सुजातपूर, चिखली बु. व खुर्द, लांजूड व हिवरा खुर्द या गावांचा समावेश आहे.