शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:27 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 

ठळक मुद्दे जलसंकट : पिण्याचे पाणी, चाराटंचाई भेडसावणार!मागील चार वर्षांंत सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे  ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेनटाकळी असे तीन  मोठे प्रकल्प आहेत, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन,  तोरणा उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यावर्षी  पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी देण्यास सुरुवात केली आहे;  मात्र मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात  परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर  गेला. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पुराचे पाणी  जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात अल्प वाढ झाली आहे.  सद्यस्थितीत या प्रकल्पात ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे.जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नळगंगा प्रकल्पात  ३८.८९, पेनटाकळी प्रकल्पात ३६.९२ व खडकपूर्णा प्रकल्पात  १३.२७ असा एकूण मोठय़ा प्रकल्पात २७.६१ टक्के जलसाठा  आहे, तर सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक प्रकल्प १00 टक्के,  ज्ञानगंगा प्रकल्पात ५२.२५, मस प्रकल्पात २९.४५, कोराडी  प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २८.२७, तोरणा प्रकल्पात  ४0.१८ व उतावळी प्रकल्पात ३७.७0 असा एकूण सात  प्रकल्पात ४१.0६ तसेच एकूण ८१ लघू प्रकल्पांत २९.0३ टक्के  जलसाठा असा एकूण जिल्ह्यातील ९१ मोठे, मध्यम व लघू  प्रकल्पात ३१.५१ टक्के जलसाठा आला आहे. सदर जलसाठा  अल्प असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाई  भेडसावणार आहे. परतीच्या पावसामुळे नदी, नाले भरल्यामुळे  काठावरील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली  आहे; मात्र पाण्याचा अल्पसाठा असल्यामुळे उन्हाळय़ात त्रास  सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी