शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी २८ हजाराचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 19:05 IST

भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाकडून ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या इलेक्ट्रानिक काट्यात दोष निर्माण केल्याप्रकरणी अखेरीस ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टीक व्यवस्थापनाला २८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे भारतीय खाद्य निगम आणि ब्लॅक स्टोन वे-ब्रिज लॉजीस्टीक व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाकडून ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.‘लोकमत’ने हा प्रकार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला होता, हे येथे उल्लेखनिय!भारतीय खाद्य निगमचे खामगाव-अकोला रस्त्यावरील गोदाम आहे. या गोदामात येणारे आणि गोदामातून शासकीय वितरणासाठी जाणाºया धान्याच्या मोजमापासाठी भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाकडून काटा प्रमाणित करून देण्यात आला होता. मात्र, भारतीय खाद्य निगमने करारबध्द केलेल्या ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक व्यवस्थापनाने वे-ब्रिजवरील इलेक्ट्रॉनिक्स काट्याचे इंडिकेटर वैद्यमापन शास्त्र विभागाला माहिती न देता बदलवून काट्यात दोष निर्माण केला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर भारतीय वैद्यमापन शास्त्र खामगाव विभागाचे निरिक्षक प्रदीप शेरकार यांनी २९ एप्रिल रोजी एफसीआयच्या गोदामावरील इलेक्ट्रानिक्स काटा जप्त केला. याप्रकरणी भारतीय वैद्यमापन शास्त्र बुलडाणा विभागाने संबंधितांना २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे भारतीय खाद्य निगमच्या ‘मापात पाप’ असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दंडाच्या कारवाईला वैद्यमापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दुजोरा दिला असून गुरूवारी काही अधिकारी पुढील कारवाईसाठी एफसीआयच्या धडकणार असल्याचे समजते. काट्यात आढळली होती छेडछाड!निरिक्षकांच्या पाहणीत एफसीआयच्या गोदामावर वैद्यमापन विभागाने प्रमाणित केलेला इलेक्ट्रानिक्स काटा आढळून आला नव्हता. तसेच  इलेक्ट्रानिक्स काट्यात छेडछाड केल्याचे उघडकीस आल्यानंतर गत १४ दिवसांपासून हा काटा जप्त करण्यात आला. काट्याचे इंडीकेटर बदलवून धान्य मोजून देताना घोळ करण्यासाठीच ही छेडछाड करण्यात आली होती.