शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२८० सायकल स्वरांनी केली लोणार सरोवराची परिक्रमा

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 7, 2023 17:27 IST

वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.

लोणार : निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम व पोषक आहार अत्यंत गरजेचा आहे. वाढत्या वाहनांच्या वापरामुळे ध्वनी व हवा प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, परिसरात सायकलची संख्या वाढत जाईल तसे आपण ''हरित लोणार'' या आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करू, असे मत पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी व्यक्त केले.

ते वन्यजीव सप्ताहानिमित्त ''मी लोणारकर'' टीम व वन्यजीव विभाग मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने लोणार अभयारण्याभोवती शनिवारी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी २८० सायकल स्वरांनी लोणार सरोवराची परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. मानव व वन्यजीव यांचे मैत्रीपूर्ण नाते कायम राहावे, यासाठी दरवर्षी वन्यजीव विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी ही वन्यजीव सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेले शुभांगी विष्णू बाजड, पलक राजेश आढाव, प्राची प्रवीण जायभाये, श्रुती गजानन बगाडे, पूजा ज्ञानेश्वर शिंगणे, सायली शंकर राठोड व रूपेश विजय कोचर या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या प्रांगणात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी वन्यजीव विभाग अकोला निमजे, निमेश मेहेत्रे, घोगरे, प्रकाश सावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, मुख्याध्यापक रामेश्वर डोळेे, वाघ, सांगळे, इंगळे, विजय जागृत उपस्थित होते. मंडळ अधिकारी संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस वितरण कविता आघाव यांनी केले.

वन्यजीव सप्ताहासाठी यांचा पुढाकारया वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनासाठी सर्पमित्र विनय कुलकर्णी, बंटी नरवाडे, विलास खरात, मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे, संतोष जाधव, विजय गोरे, समीर शहा, गोपाल सरकटे, रवींद्र तायडे, प्रकाश सानप, भूषण सानप, रोहन सोसे, सुशील सोसे, उमेद चिपडे, सचिन मस्के, शैलेश सदार, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर कचरे, विनोद थोरवे व संपूर्ण ''मी लोणारकर'' टीम, तसेच वन्यजीव विभागाचे सुरेश माने, सुनीता मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव वाघ, गजानन शिंदे, निरंजन पोले यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा