शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचे २६ दावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:05 IST

- अनिल गवई खामगाव :  मुंबई  येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चांगल्याच अडचणीत सापडल्याचे दिसते. दमानिया यांच्याविरोधात विविध तक्रारींच्या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव वाढत असतानाच, राज्यातील विविध न्यायालयात त्यांच्यावर अब्रु नुकसानीचे एकुण २६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ...

ठळक मुद्देअंजली दमानिया माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चांगल्याच अडचणीत सापडल्याचे दिसते. त्यांच्यावर अब्रु नुकसानीचे एकुण २६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विविध न्यायालयात अब्रु नुकसानीचे २० दावे दाखल असून, यामध्ये नव्याने जळगाव खांदेश न्यायालयात ४ तर इतर ठिकाणी २ दावे दाखल करण्यात आले आहेत. 

- अनिल गवई 

खामगाव :  मुंबई  येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चांगल्याच अडचणीत सापडल्याचे दिसते. दमानिया यांच्याविरोधात विविध तक्रारींच्या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव वाढत असतानाच, राज्यातील विविध न्यायालयात त्यांच्यावर अब्रु नुकसानीचे एकुण २६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडविण्याच्या दृष्टीकोनातून चोपडा अर्बन को-आॅप बँक लि. चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. इतकेच नव्हे तर हे चेक खरे म्हणून न्यायालयात सुध्दा वापरले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी दमानिया यांनी न्यायालयाचीही फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध ठिकाणी जोर धरत आहे. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या खोटे आरोप केल्याप्रकरणी दमानिया यांच्याविरोधात राज्यातील विविध न्यायालयात अब्रु नुकसानीचे २० दावे दाखल असून, यामध्ये नव्याने जळगाव खांदेश न्यायालयात ४ तर इतर ठिकाणी २ दावे दाखल करण्यात आले आहेत. 

अंजली दमानिया यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात शनिवारपासून तक्रारींचा ओघ वाढत आहे. शनिवारी माधव पाटील यांनी शहर पोलिस स्टेशनला पहिली तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी  बोरी अडगाव येथील अच्युतराव पुरूषोत्तम टिकार यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तर अभिमन्यू त्र्यंबक पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.  मंगळवारी मेहकर येथे चंदन किशोर सहगल जिल्हा सरचिटणीस, भाजयुमो, बुलडाणा, डोणगाव येथे प्रदीप दत्तात्रय इलग जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी भाजप, चिखली येथे संतोष मुरलीधर अग्रवाल, रायपूर पोलिस स्टेशनमध्ये प्रभाकर लक्ष्मण जवंजाळ यांनी तर अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये पंजाबराव हिंमतराव जंवजाळ यांच्यासोबतच  लोणार आणि जानेफळ पोलिस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 

...तर तीव्र आंदोलनाचा इशारा!

 न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी खामगावसह विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारींची पोलिस प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल. 

 

अंजली दमानिया यांनी भारतीय जनता पक्ष आणि भाजप नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हेतूपुरस्पर प्रयत्न चालविले आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांना खोटेपणाचा आधार घ्यावा लागला, यातच माझ्यासह माझ्या पक्षाचा विजय आहे. दमानिया विरोधातील तक्रारी या कार्यकर्त्यांच्या स्वयंस्फूर्त भावना आहेत. 

    - एकनाथ खडसे,    भाजप नेते, महाराष्ट्र

 

दमानिया यांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी आपल्यासह अनेक जण स्वत:हून पुढे येत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, हीच आपली मागणी आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करण्याची आपली भूमिका आहे.

    - माधव पाटील,    तक्रारकर्ते, खामगाव.

 

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपची बदनामी करणाºया अंजली दमानिया यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे. आपणासोबतच बहुजन नेतृत्व म्हणून वंजारी समाज माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठीशी आहे.

- प्रदीप इलग, जिल्हाध्यक्ष, भाजप विद्यार्थी आघाडी, बुलडाणा.

 

अंजली दमानिया यांच्या विरोधात दोन तक्रार अर्ज खामगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल आहे. या अर्जाची नोंद पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.    - संतोष टाले,    पोलिस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाEknath Khadaseएकनाथ खडसेkhamgaonखामगाव