शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर - शशिकांत खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:06 IST

सिंदखेड राजा :  मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपायंच्या कामांना पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजाताली स्मारकांच्या जतन व दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

ठळक मुद्देपुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाची अखेर मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा :  मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपायंच्या कामांना पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजाताली स्मारकांच्या जतन व दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.सिंदखेड राजा येथे यासंदर्भात शिवसेनेचे आ. शशिकांत खेडेकर यांनी स्थानिक विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन गुरूवारी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत अतीष तायडे, सतीष काळे, संजय मेहेत्रे, दिलीप आढाव, प्रकाश मेहेत्रे, पींटू पवार, राजू आढाव, दीपक बोरकर, अक्षय केरळकर यांच्यासह अन्य शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ऐतिहासिक सिंदखेड राजा शहर व येथील स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने शेगाव तिर्थस्थळ विकास आराखड्याच्या धर्तीवर सिंदखेड राजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. परंतू निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच या विकास आराखड्यातील ३११ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपयांच्या निधीस पाच जानेवारी २०१८ रोजी त्यास मंजुरी मिळाली असल्याचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजा येतील पाच राज्य संरक्षीत स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामांना ही मान्यता देण्यात आली असल्याचे आ. खेडेकर म्हणाले. पाच जानेवारी रोजी पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदत गर्गे यांनी त्यासंदर्भातील पत्रच दिले आहे.या निधीमधून लघुजीराव जाधव राजवाड्यासाठी चार कोटी १४ लाख, ११ हजार १५५, सावकारवाड्यासाठी एक कोटी ९८ लाख, २३ हजार २७२, रंगमहालासाठी दोन कोटी १२ लाख ७ हजार ३५१, नीळकंठेश्वर मंदिरासाठी  एक कोटी २७ लाख ८८ हजार, ८३८, काळाकोटसाठी तीन कोटी ४४ लाख,६८ हजार ५५९ रुपये जतन व संवर्धनासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे आ. शशिकांत खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा