शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यातील २१९ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्याच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:45 IST

मेहकर : तालुक्यातील २९९ अंगणवाड्यापैकी २१९ अंगणवाड्याना स्वातंत्र खोल्याच नाहीत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाड्यातील बालकांचे हाल होत आहेत. काही गावच्या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरविण्यात येतात.

- उध्दव फंगाळ

मेहकर : तालुक्यातील २९९ अंगणवाड्यापैकी २१९ अंगणवाड्याना स्वातंत्र खोल्याच नाहीत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाड्यातील बालकांचे हाल होत आहेत. काही गावच्या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरविण्यात येतात.   तालुक्यातील अंगणवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकामध्ये नाराजी दिसून येत आहे. मेहकर येथील बालविकास प्रकल्प भाग एक व दोन अंतर्गत ग्रामीण भागात २९९ अंगणवाड्या आहेत. यापैकी केवळ ८० अंगणवाड्यांना स्वातंत्र खोल्या आहेत. तर २१९ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्याच नाहीत. त्यामुळे ह्या अंगणवाड्या समाज मंदिर, शाळा आदी ठिकाणी भरविण्यात येतात. जवळपास ६० अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात बालविकास प्रकल्प कार्यालय भाग एक अंतर्गत १६८ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ४५ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या आहेत. तर पाच अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात. इतर अंगणवाड्या गावातील शाळा, समाज मंदिरात भरविण्यात येतात. बालविकास प्रकल्प कार्यालय दोन अंतर्गत १३१ अंगणवाड्या आहेत. यापैकी ३५ अंगणवाड्यांना स्वातंत्र खोल्या आहेत. नऊ ठिकाणच्या अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात. २९९ अंगणवाड्यामध्ये जवळपास २० हजारच्यावर बालक आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने इतर ठिकाणी भरविण्यात येत असल्यामुळे बालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वतंत्र्य खोल्या नाहीत, अशा ठिकाणी खोल्यांचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी पालकामधुन होत आहे. (तालुका प्रतिनिधी) केवळ ६० अंगणवाड्यांनाच स्वतंत्र शौचालय प्रत्येक शासकिय कार्यालय शाळा, अंणवाड्या या ठिकाणी स्वतंत्र शौचालय असले पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र मेहकर तालुक्यात असलेल्या २९९ अंगणवाड्यापैकी ८० अंगणवाड्यांना स्वातत्र खोल्या आहेत. या ८० अंगणवाड्यापैकी केवळ ६० अंगणवाड्यांना स्वतत्र शौचालय आहेत. इतर अंगणवाड्यांना स्वतत्र शौचालय नाही. बालविकास प्रकल्प भाग एक अंतर्गत ज्या गावात स्वतंत्र खोल्या नाहीत अशा गावात स्वतंत्र खोल्या बांधाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून बालकांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे.           -  आर. के. सपकाळ,    बालविकास प्रकल्प अधिकारी, भाग एक मेहकर

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर