शेगाव : अज्ञात चोरट्यांनी मोबाईल व दुचाकी असा २१ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना स्थानिक श्रीराम नगरमध्ये काल २८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक श्रीराम नगर मधील राहुल रामेश्वर खोले यांच्या घरातून काल रात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल तसेच घरासमोरील दुचाकी असा २१ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शेगाव येथे २१ हजार लंपास
By admin | Updated: June 30, 2014 02:09 IST