शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र बंद होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:07 IST

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले जिल्हयातील २ तर राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. यामध्ये चिखली, खामगाव या केंद्राचा समावेश आहे. या निर्णयाने राज्यातील २५० कर्मचाºयांना इतरत्र सेवेत रुजू केले जाणार असले तरी अद्याप प्लेसमेंटबाबत अनिश्चितता आहे. या निर्णयाने कर्मचारी धास्तावले आहेत.बिएसएनएल कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून देत अनेक ठिकाणचे बिएसएनल कार्यालयातील कर्मचारी कपात गत महिन्यात देशात सर्वत्र झाली. बिएसए़नएल नंतर आता प्रसारभारतीकडे केंद्र सरकारने लक्ष वेधले आहे. प्रसारभारती अंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील लघुप्रक्षेपण दूरदर्शन केंद्र बंद करण्याबाबत ३ मार्चरोजी संध्याकाळी इ-मेल धडकला. केंद्र नेमके का बंद होत आहेत. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते. यामुळे कर्मचाºयांमध्ये नोकरी जाण्याची धास्ती वाढली आहे. प्रसारभारतीच्या मुख्य कार्यालयातून सर्व लघुप्रक्षेपण दूरदर्शन केंद्रांना पत्र पाठवण्यात आले आहे. 

राज्यातील हे केंद्र होणार  बंद भारत सरकारच्या नियंत्रणातील अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाड, खामगाव, खोपाली, किनवट, महाड, म्हसले, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, सहाद, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरेगा, उमरखेड ही दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद होणार आहेत. 

चॅनल क्रमांक २१ दिसणार नाहीदूरदर्शन महानिदेशालय यांच्या आदेशानुसार खामगाव दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रामार्फत प्रसारीत केल्या जाणाºया चॅनल क्रमांक २१ वरील कार्यक्रम यापुढे दिसू शकणार नाही. ३१ मार्च पासून ही सेवा खंडीत केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव