शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २० सोनोग्राफी सेंटर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:06 IST

ज्या गावांत, तालुक्यात लींग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने केल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात नोंदणीकृत १०५ सोनोग्राफी सेंटर असून त्यापैकी २० केंद्र बंद आहेत. स्त्री-पुरूष गुणोत्तराचे प्रमाण प्रती हजारी ९२१ आहे. काही वर्षापूर्वी हे प्रमाण संवेदनशील आकड्यांपर्यंत पोहचले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९५ केंद्रावर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. सोनोलॉजिस्टचा अभाव व इतर त्रुट्यांमध्ये अडकलेल्या चार केंद्राना वर्षभराच्या तपासणीमध्ये सील ठोकण्यात आलेले आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी गर्भपातीची काही प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली होती. त्यापैकी काही प्रकरणांचे परराज्यात धागेदोरे जात असल्याने बुलडाणा जिल्ह्याची संवेदनशील म्हणून ओळख निर्माण झाली होती. या कथीतस्तरावर आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष याकडे दिले. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील सोनोंग्राफी केंद्रांची दर तीन महिन्याला नियमीत तपासणी सुरू करण्यात आली. पीसीपीएनडीटीच्या बैठकाही वारंवार व्हायला लागल्या. मध्यंतरी राज्यस्तरीय पथकाकडून ड्रयीव्हीची तपासणी झाली. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या तपासणीच्या भितीने काही सेंटर विनंतरीवरून बंद झाले. तर काही पीसीपीएनडीटी कायद्यात बसत नसल्याचे आढळून आले. कायद्यांतर्गत येणाºया नियमांचे उल्लंघन व त्रुट्या आढळून आलेल्या चार केंद्राना आरोग्य विभागाकडून सील ठोकण्यात आलेले आहे. त्यामध्ये डोणगाव एक, सिंदखेड राजा दोन व चिखली येथील एका केंद्राचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १०५ पैकी ९५ केंद्र सुरू आहेत. डोणगाव येथील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र इतर प्रकरणांमध्ये नेमक्या काय त्रुट्या आढळून आल्या याचा अहवाल प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवला आहे. (प्रतिनिधी)सहा महिन्यात तीन बैठकागेल्या सहा महिन्यामध्ये पीसीपीएनडीटीच्या तीन बैठका झाल्या आहेत. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ह्या बैठकांवर भर दिला जात आहे. १५ मे, ९ जुलै व १९ सप्टेंबर या कालावधीत तीन बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर चौथी बैठक ही ४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

गर्भपाताची माहिती देणाºयाने पटकावले लाखाचे बक्षीसबेकायदेशीर गर्भपाताची माहिती देणाºया खबºयाला पूर्वी मिळणाºया २५ हजार रुपयांच्या बक्षीसात तीनपट वाढ करून ते एक लाख रुपये करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाच व्यक्तीने हे एक लाखाचे बक्षीस पटकावले आहे. त्याचे नाव गुपीत ठेवण्यात आले आहे.

सोनोलॉजिस्टचा अभावसोनोग्राफी केंद्रावर सानोलॉजिस्ट नसणे ही गांभर्याची बाब आहे. काही केंद्र त्याठिकाणी कार्यरत कर्मचारीच चालवत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी तीन सोनोग्राफी सेंटर हे विनंतीवरून बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोनोग्राफी सेंटरवर सोनोलॉजिस्ट नसल्याचे आढळून आले.जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्राची नियमीत तपासणी केली जाते. ज्या गावांत, तालुक्यात लींग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने केल्या जात आहेत.- डॉ. प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्य चिकित्सक़

टॅग्स :buldhanaबुलडाणा