शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

बुलडाणा जिल्ह्यातील २० मुले घेताहेत माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 18:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा:  बोलिलीं लेंकुरें, वेडी वाकुडीं उत्तरें!करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध!नाहीं विचारिला, अधिकार म्यां आपुला!तुका म्हणें ज्ञानेश्वरा, राखा पायां पैं किंकरा!तुकाराम महाराजांनी माऊलींसाठी म्हटलेल्या ह्या अभंगाच्या ओळींना बुलडाणा जिल्ह्यातील मुले आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींसमोर उजाळा देत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २० मुले गेल्या महिनाभरापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आध्यात्माचे धडे गिरवत आहेत. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी या सर्व मुलांची मोफत व्यवस्था आळंदी येथे केली आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या या मुलांना संस्कृतबरोबरच इरत भाषा व आध्यात्माचे शिक्षण दिल्या जात आहे. बालकांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी अनेक ठिकाणी मुलांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्याचा नवा पायंडाच निर्माण झाला आहे. मुलांना शाळेला सुट्या लागल्यानंतर एखाद्या मंदिरावर संस्कार शिबीर घेण्याचे अनेक उपक्रम आपल्याला सापडतील. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्यासाठी त्यांना संस्कृत येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. त्यामुळे मुलांचे मन सुसंस्कारित करण्यासाठी आणि तेही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतच मुलांमध्ये संस्काराबरोबरच संस्कृतचे ज्ञान देण्यासाठी मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील लक्ष्मण महाराज यांनी बुलडाणा जिल्ह्यातून घाटनांद्र व परिसरातील अशी २० मुले आळंदी येथे नेले आहेत. आळंदी येथील श्रीगुरू देऊ फड याठिकाणी संस्कृत व संस्कार शिबीर घेण्यात येत आहे. त्यामध्ये मुलांना आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच संस्कृत भाषेचा परिचही करून दिला जात आहे. प्रत्यक्ष माऊलींच्या आळंदीत हे शिबीर घेतले जात असल्याने मुलांमध्ये या शिबीराचे एक वेगळे आकर्षण आहे. मुलांची राहण्याची, भोजनाची व त्यांना सांभाळण्याची सर्व जबाबदारी लक्ष्मण महाराज देशमुख यांनी समर्थपणे उचलली आहे. 

इंद्रायणी मातेची स्वच्छतामुलांना सदाचार, साधना, धर्मप्रेम अन राष्ट्रभक्ती शिकवण्या बरोबरच स्वच्छतेचेही महत्त्व त्यांना प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिल्या जात आहे. प्रत्येक रविवारी आळंदीतील इंद्रायणीच्या परिसरात मुले स्वच्छता करत आहेत. 

दैनंदिन कार्यक्रमसकाळी चार वाजता उठल्यानंतर भ्रमण जप (रामकृष्ण हरी जप), अंघोळ आटोपल्यानंतर पाच ते सहा नगर प्रदक्षणा, माऊली दर्शन, सूर्यनमस्कार, प्राणायक, हनुमान चालिसा, सकाळी ८.३० ते ११ पाठांतर व लिखाण,  दुपारी पाठ त्यामध्ये रचना, कौमोदी संस्कृत, सायंकाळी हरिपाठ, झोपण्यापूर्वी गायत्री व मृत्यंूजय मंत्राचा जप असे दिवसभरातील नियोजन असते. 

 पाल्यांना  सुसंस्कारीत करण्यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आज संस्कार शिबीर व संस्कृत शिकणे ही काळाची गरज झाली आहे. आळंदी येथे मुलांना आध्यात्माचे धडे देऊन त्यांना सुसंस्कारीत करण्याचा हा प्रयत्न आहे. लक्ष्मण महाराज देशमुख (आळंदीकर).

टॅग्स :buldhanaबुलडाणा