शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

रोजगार हमीच्या कामात २ कोटींचा अपहार

By admin | Updated: January 26, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार; मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३३ अपहाराची प्रकरणे.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा :ह्यअध्र्यात तुम्ही अध्र्यात आम्हीह्ण यालाच म्हणतात रोजगार हमी. या उक्तीप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजनेसह अन्य ग्रामविकासाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी ग्राम विकासासाठी नव्हे, तर स्वविकासासाठी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. रोहयोची योजना सुरू झाल्यापासून आजतागायत सुमारे २0३ अपहाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये शासनाच्या २ कोटी ८१ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे सिद्ध झाले आहे. माहितीच्या अधिकारात हे घबाड बाहेर आले आहे. शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास हा उद्देश समोर ठेवून शासनाने ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अशा विविध योजना सुरू केल्या. त्यातीच रोजगार हमी योजना, जवाहर ग्रमासमृद्धी योजना आणि अलीकडे सुरू झालेली मनरेगा. या योजनेच्या माध्यमातून विहीर खोदणे, तलाव व नाल्यातील गाळ काढणे, नालाबंडिंग, रोपवाटिका केंद्र उभारणे, रस्त्यांची कामे यासारखी कामे केली जातात. मजुराच्या हाताला काम देण्याबरोबरच या माध्यमातून खेड्याचा विकास साधल्या जातो; मात्र कर्मचारी-अधिकार्‍यांच्या संगनमताने या योजनसाठी येणारा कोट्यवधी रुपयाचा निधी हडप केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २0१४ पर्यंत ८६६ ग्रामपंचायतीमध्ये अपहाराच्या २0३ प्रकरणात २ कोटी ८१ लाख ६५ हजार ८७६ रुपयाचा निधी हडप केल्याचे उघडकीस झाले आहे. यापैकी आतापर्यंत १0२ प्रकरणाची प्रशासनाने चौकशी केली असून, केवळ ५२ प्रकरणे निकाली काढले आहेत. चौकशीअंती जेमतेम १३ लाख ८४ हजार रुपये वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरण्यात आले आहेत. तर १0१ प्रकरणांची अद्याप साधी प्राथमिक चौकशीसुद्धा झाली नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. म्हणजे अजूनही वसुलीस पात्र असलेल्या प्रकरणातून संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून सुमारे दीड कोटी रुपये वसूल करणे बाकी आहेत.