शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भिलवाडा पॅटर्नच्या अंमलबजावणीसाठी १८० जण कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 15:02 IST

नांदुरा येथे नगर पालिका प्रशासनाच्या आराखड्यानुसार सर्वेक्षण

अनिल गवई

खामगाव: कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पॅटर्नच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने १८० जणांची नियुक्ती केली असून, बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा नगर पालिका ही भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करणारी पहिली पालिका ठरतेय.  जगभर हाहाकार माजविणाºया कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदुरा नगर पालिकेने सुरूवातीपासूनच अंमलबजावणी सुरू केली. भिलवाडा  पॅटर्नच्या धर्तीवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एक आराखडा विकसीत केला. यासाठी शिक्षक आणि कर विभागातील १८० जणांची नियुक्ती करण्यात आली. 

वार्डनिहाय तिघांची नियुक्ती!

नांदुरा शहरात २१ वार्ड आहेत. या वार्डांसाठी प्रत्येकी तीन जणांना जबाबदारी देण्यात आली आहे. यातील ४० जण घरावर नंबर आणि कुटुंब प्रमुखांच्या नावांची नोंद घेत, पुढील कारवाई केली जाणार आहे.

शिक्षकांना प्रत्येक वार्डाचे पालकत्व!

नगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना वार्डनिहाय पालकत्व देण्यात आले आहे. कर विभागातील कर्मचाºयांशी समन्वय करून या शिक्षकांना आपल्या वार्डात शंभरटक्के सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे. या शिक्षक आणि कर विभागातील कर्मचाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकही नियुक्त केले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नांदुरा नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भिलवाडाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या कृतीशील अंमलबजावणीसाठी १६३ जणांची नियुक्ती केली आहे. कोरोनाचा एकजुटीने सामना करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

-नीरज नाफडे,

आरोग्य तथा पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा