शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

कोविड रुग्णांच्या देयक तपासणीसाठी १८ ऑडिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:17 IST

Buldhana News : ६० खासगी कोविड रुग्णालयाकरिता एकूण १८ ऑडिटरची नेमणूक करण्यात आलेली आहे़.  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खासगी काेविड रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे़.  या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णाालयांतील काेविड रुग्णांच्या देयक तपासणीसाठी १८ ऑडिटरची नियुक्ती केली आहे़. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण ६० खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोविड केअर सेंटरकरिता परवानगी देण्यात आली  आहे.  या खासगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून रुग्णालयामध्ये जादा रक्कम घेतल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत़  कोरोनाबाधित रुग्णांकडून, नातेवाइकांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरिता या देयकांचे ऑडिट करणे आवश्यक असल्याने  जिल्ह्यातील ६० खासगी कोविड रुग्णालयाकरिता एकूण १८ ऑडिटरची नेमणूक करण्यात आलेली आहे़.  त्यांची यादी  जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.मान्यताप्राप्त डेडिकेटेड कोविड केअर सेंटरकरिता खासगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून रुग्णालयामध्ये जादा रक्कम घेतल्याची तक्रार असल्यास किंवा देयकाबाबत काही शंका असल्यास संबंधित तालुक्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या ऑडिटर यांच्याशी तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या