बुलडाणा : उद्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महसूल विभागाचे १२ हजार, तर पोलिस विभागाचे पाच हजार असे १७ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी लावण्यात आले आहेत. मतदारांनी भयमुक्त होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी पत्रकार परिषदेत आज येथे केले.जिल्ह्यात भयमुक्त मतदान पार पडावे आणि मतदारांना निर्भयपणे त्यामध्ये सहभागी होता यावे म्हणून जिल्ह्यातील ११९ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसह अन्य प्रक्रियांसाठी पाच हजार पोलिस कर्मचारी अधिकारी तैणात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्याच्या सीमेवर १४ ठिकाणी चेकपोस्ट आहेत, तर २0 स्थिर आणि २२ फिरते पथक नेमण्यात आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्या संशयित ४0५ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १ हजार ७८ लोकाविरुद्ध अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. प्रचारकाळात उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत अवैध दारूसाठी १0५ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, महिती अधिकारी दैठणकर उपस्थित होते.*४३५ शस्त्रे केलीत जमाजिल्ह्यात ५३६ व्यक्तीकडे शस्त्राचे परवाने आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ४३५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. एक अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
१७ हजार कर्मचारी तैनात
By admin | Updated: October 14, 2014 00:26 IST