धामणगाव बढेत काेराेनाचा उद्रेक
माेताळा : शहर व तालुक्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. धामणगाव बढे येथील २९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. माेताळा शहरातील १०, ब्राम्हंदा ११, चिंचपूर ४, राजूर ४, सारोळा मारोती ६, वडगाव ६, बोराखेडी ४, जयपूर ९, किन्होळा ५, पान्हेरा येथील तिघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बुलडाणा तालुक्यात चाैघांचा मृत्यू
बुलडाणा : शहरासह तालुक्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी आणखी चाैघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बुलडाणा येथील ५२ वर्षीय पुरुष, सातगाव, ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरुष, धाड नाका बुलडाणा येथील ५८ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.