शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 11:01 IST

Buldhana News : १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचनक्षमता असलेल्या १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते. मात्र पाच वर्षानंतरही त्यासंदर्भातील अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जवळपास ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे १५ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले होते.त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांवर हे यंत्र बसविण्यासंदर्भात २०१७ मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अद्यापही त्या पूर्णत्वास गेलेल्या नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे (मेरी) निधीही जमा करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झालेली नाही. मेरीच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे बाष्पीभवन मापक यंत्र प्रकल्पांवर लावण्यात येणार आहेत. हवामानातील बदल, वाढते उष्णातामान आणि अपघाव पद्धतीने पडणारा पाऊस पाहता पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे या दृष्टिकोनातून या हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य शासनाने यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास मंडळालाही त्यावेळी पत्र पाठवले होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पावर या सुविधा आहेत. मात्र आपल्याकडे त्या नाहीत, असे सुत्रांनी  स्पष्ट केले. यंदाच्या पावसाळ्यातील दोन महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. 

या प्रकल्पांचा होता समावेशजिल्ह्यातील नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी, मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, डोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राम्हणवाडा या प्रकल्पावर हे यंत्र बसविण्यात येणार होते. नळगंगा प्रकल्पावर पूर्वी ते बसविण्यात आले होते. मात्र ते नादुरुस्त झाल्याने त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. प्रकल्पांच्या भिंतीलगत, मोकळ्या जागेत जेथे उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी सावलीत हे यंत्र लावण्यात येणार होते.

पाणीवापराचा अचूक अंदाज मिळेलया यंत्रामुळे प्रकल्पातील जलसाठ्यापैकी प्रत्यक्षात किती पाण्याचे बाष्पीभवन होते याचे मोजदाद होऊन जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी, शेती सिंचनासाठी नियोजन करणे सोपे जाईल. जलसाठ्यातील जवळपास ३० टक्के पाण्याचे साधारणत: बाष्पीभवन होते. अलिकडील काळात वाढलेले तापमान पाहता हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  १५ वर्षापूर्वी याबाबत अभ्यास करण्यात आला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प