शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

१५ हजार रिक्षाचालकांच्या राेटीचा प्रश्न मिटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान ऑटाेरिक्षा चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी परवाना धारकांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ हजार ९३१ ऑटाेरिक्षा चालकांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे.

गत वर्षीपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने ऑटाेरिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च महिन्यांपासून शासनाने निर्बंध लावणे सुरू केले आहे. त्यातच काेराेना रुग्ण वाढत असल्याने १५ एप्रिलपासून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सरकारने ऑटाेचालकांना मदत देण्याची घाेषणा केली असली तरी इतरांचे काय, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्यातील परवाना धारक

रिक्षाचालकांची संख्या

१४,९३१

मिळालेली मदत ताेकडीच

गत वर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, बँकांचे हप्तेही भरू शकलाे नाही. सरकाने १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत ताेकडी आहे. या मदतीतून कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण आहे.

गजानन सरकटे, ऑटाेचालक

सरकारने जाहीर केलेल्या मदतीमुळे ऑटाेचालकांना दिलासा मिळणार आहे. नाेंदणीकृत ऑटाेचालकांनाच ही मदत मिळणार असल्याने खासगीमध्ये ऑटाे चालवणाऱ्यांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे सरसकट ऑटाेचालकांना सरकारने मदत द्यावी.

अर्जुन शेळके, ऑटाेचालक

सततच्या लाॅकडाऊनमुळे ऑटाेचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मदत देण्याची घाेषणा केल्याने ऑटाेचालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक युवक भाड्याने ऑटाे घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सरसकट मदत देण्याची गरज आहे. -शे. ताैफिक, ऑटाेचालक