शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या पोहोचली १९८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:49 IST

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता १९८ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात शनिवारी तब्बल १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या असून यात मलकापूरमधळी पाच, धामणगाव बढेमधील सहा तर नांदुऱ्यामधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि खामगावमधील दाल फैल भागातील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता १९८ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १८३ कोरोना बाधीत होते. त्यात १५ ने आता वाढ झाली आहे. अकोला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ६५ अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यात ५० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील एका १२ वर्षीय मुलीसह सहा महिलांचा समावेश आहे. मलकापूर शहरातील आणखी पाच जण पॉझिटिव्ह आले असून यात मोहनपुरा भागातील एक महिला, १७, ३७, ३५ वर्षाच्या व्यक्तींचा समावेश आहे. सोबतच एक ४५ वर्षीय व्यक्ती पॉझिटव्ह आला आहे. मुळचा डोणगाव येथील असलेला एक व्यक्ती परदेशातून आल्यानंतर मेहकरमधील हॉटेलमध्ये क्वारंटीन होता तो ही पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे नांदुºयातील घासलेट पुरा भागातील सहा वर्षीय मुलगा, ४३ वर्षीय एक व्यक्ती आणि खामगावमधील दालफैल भागातील एक ७५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे मलकापूरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. चाळीस बिघा परिसरातील हा व्यक्ती होता. २,४१८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.१०१ रुग्णांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. तर ४८ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

धामणगाव बढेमध्ये कोरोना बाधीतांची संख्या १२धामणगाव बढे: शनिवारी प्राप्त कोरोना पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगाव बढे येथील सहा महिला पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १२ झाली आहे. यामध्ये १९ जून रोजी मृत्यू पावलेल्या युवकाचाही समावेश आहे. येथे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच व्यक्ती या मृत व्यक्तीच्या निकवर्तीयांपैकी आहेत.मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील ८३ व्यक्तींना आतापर्यंत बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गावातील एकंदर स्थिती प्रसंगी गंभीर बनण्याची स्थिती पाहता गावाच्या सीमा बंद करण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या