शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेसाठी ‘जलयुक्त’मधून दीड लाखांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:02 IST

यांत्रिकीकरणाद्वारे करावयाच्या काही कामांसाठी गावनिहाय इंधन खर्चासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यात वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व सक्रियपणे काम करणाऱ्या गावांमध्ये श्रमदानाव्यतिरिक्त यांत्रिकीकरणाद्वारे करावयाच्या काही कामांसाठी गावनिहाय इंधन खर्चासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.या संदर्भाने मृत व जलसंधारण विभागाने दहा मे रोजीच अनुषंगिक आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील बुलडाणा जिल्ह्यासह प्रामुख्याने २४ जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेच्या कामांना वेग मिळणार आहे. मृत व जलसंधारण विभागाचे अवर सचिव नाईक यांनीच अनुषंगिक आदेश काढला आहे.२०१९ मध्ये राज्यातील उपरोक्त २४ जिल्ह्यामध्ये वॉटर कप स्पर्धेची कामे सध्या जोमात सुरू आहेत. सोबतच यंदा स्पर्धेच्या कालावधीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचाही हुरूप वाढला आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील १४१ गावांत कामांनी वेग घेतला असून, त्यातल्या त्यात ४१ गावांतील कामे अधिक दर्जेदार पद्धतीने होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.अशा गावांमध्ये मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाद्वारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशीनद्वारे करण्यात येणाºया कामाकरिता इंधनाचा खर्च म्हणून प्रती गाव दीड लाख रुपये निधी जलयुक्त शिवार अभियानातून चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात येणार असल्याचे एसएओंनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेचा आधार मिळाल्यामुळे वॉटर कप स्पर्धेला गती मिळणार आहे. श्रमदानाला आर्थिक मदतीची जोड मिळाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात नागरिकांचा सहभाग वाढणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवारWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा