शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारपासून १५ दिवस जनता कर्फ्यु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:11 IST

१८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीतांच्या आकड्याने पाच हजारचा टप्पा पार केला असून संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शुक्रवारपासून जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. अधिकृतस्तरावर लॉकडाऊन घोषित करता येत नसले तरी नागरिकांमध्ये कोरोनासंदर्भाने नसलेली सतर्कता पाहता अनेकांच्या आलेल्या सुचना पाहता १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.राज्यात सांगली, बारातमती, कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला असून त्याच धर्तीवर बुलडाण्यातही हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. पुर्वीच्या पद्धतीने हा जनता कर्फ्यु राहणार नसून त्याची कडक व काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. डॉ. संजय गायकवाड आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.या जनता कर्फ्युची गंभीरतने अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रशासकीय पातळीवरही अधिकारी वर्गात योग्य समन्वय ठेवून कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे १५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येणार असून २६ लाख ६० नागरिकांचे यामध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी १,७१८ पथके नियुक्त करण्यात आली त्यात ५,१५४ सदस्य राहणार आहेत. प्रामुख्याने दुर्धर आजार असलेल्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या आजाराचे कोवीड-१९ मध्ये रुपांतर होणार नाही, याची काळजी यामध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनता कफ़्र्यु व या अभियानाच्या माध्यमातून येत्या दसऱ्याला कोरोनाचे दहन करण्यासाठी जिल्ह्याने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनच त्यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक