शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

सरपंच पदासाठी १३५, सदस्यांसाठी २९0 उमेदवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:18 IST

मेहकर: तालुक्यातील ५0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ५0 ग्रामपंचायतीं पैकी ३ ग्रा.पं. हय़ा संपूर्णपणे अविरोध झाल्या आहेत. तर तीन  गावचे केवळ सरपंच अविरोध व एकूण १३४ ग्रा.पं. सदस्य  अविरोध झाले आहेत. आता ४४ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी  १३५ उमेदवार हे सरपंच पदासाठी तर सदस्य पदासाठी २९0  उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदान शांततेत पार  पाडण्यासाठी निवडणूक विभाग व पोलीस विभाग सज्ज झाला  आहे. 

ठळक मुद्देतीन ग्रामपंचायत अविरोध १३४ सदस्य अविरोध

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील ५0 ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये ५0 ग्रामपंचायतीं पैकी ३ ग्रा.पं. हय़ा संपूर्णपणे अविरोध झाल्या आहेत. तर तीन  गावचे केवळ सरपंच अविरोध व एकूण १३४ ग्रा.पं. सदस्य  अविरोध झाले आहेत. आता ४४ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी  १३५ उमेदवार हे सरपंच पदासाठी तर सदस्य पदासाठी २९0  उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मतदान शांततेत पार  पाडण्यासाठी निवडणूक विभाग व पोलीस विभाग सज्ज झाला  आहे. ग्रा.पं.च्या पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यात असलेल्या ९८  ग्रामपंचायतींपैकी ५0 ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत.  त्यासाठी १५ सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात  आली होती. यावेळेस  सरपंच पद हे जनतेमधून मतदान होऊन  निवडून द्यायचे असल्याने प्रत्येक गावात आजी-माजी ग्रा.पं.  पदाधिकारी तर काही गावात रथीमहारथी निवडणुकीत आपले  नशीब आजमावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला  महत्त्व दिल्या जात नसले तरी पण विविध पक्षांचे  नेते प्रत्येक  गावच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.  ग्रा.पं.ची निवडणूक  अनेक ठिकाणी चुरशीची आहे.

सहा सरपंच तर १३४ सदस्य अविरोधमेहकर तालुक्यातील ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये ३ ग्रा.पं.मध्ये  वागदेव, बाभुळखेड व वडगाव माळी या ठिकाणी सरपंचासह  सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तर द्रुगबोरी,  नायगाव देशमुख, वरदडा या गावचे केवळ सरपंच अविरोध  झाले आहेत. तर ५0 ग्रा.पं.च्या ४२४ सदस्यापैकी १३४ सदस्य हे  अविरोध निवडून आले असून, आता ४४ सरपंच पदासाठी १३५  उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

मतदानासाठी १४१ बुथहोऊ घातलेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी १४१ बुथ लावण्यात  येणार आहेत. तर जवळपास ६00 कर्मचारी नियुक्त करण्यात  आले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 पर्यंंत  मतदान होणार असून, निवडणूक निरीक्षक म्हणून उपविभागीय  अधिकारी डॉ. नीलेश अपार तर निवडणूक अधिकारी म्हणून  तहसीलदार संतोष काकडे हे काम पाहत आहेत. 

वागदेव सरपंच, सदस्यांचा भाजपकडून सत्कार तर दुसर्‍या  दिवशी शिवसेनेत दाखलमेहकर तालुक्यातील वागदेव येथील ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच  व सदस्य हे अविरोध निवडून आले आहेत. तर वागदेव येथील  सरपंच व सदस्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला. तर  दुसर्‍याच दिवशी हे सरपंच व सदस्य हे शिवसेनेत दाखल होऊन  खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या  घडामोडीची मेहकर तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.  शिवसेना पक्ष खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  गेल्या २५ ते ३0 वर्षांपासून मेहकर तालुक्यात कार्य करीत आहे.   शिवसेनेची पाळेमुळे प्रत्येक खेड्यात पोहचली आहेत.  शिवसेनेची मजबूत पकड ग्रामीण भागात आहे. तर याउलट  भाजपची परिस्थिती दयनीय आहे. भाजपमध्ये मेहकर शहर व  तालुक्यात केवळ नेते, पदाधिकारी यांचाच थोडाफार भरणा  आहे. भाजपने केवळ श्रेय घेण्यासाठी वागदेव येथील अविरोध  सरपंच व सदस्यांचा सत्कार करून घेतला; मात्र एकाच दिवसात  हा प्रकार उघड झाला व दुसर्‍याच दिवशी ही मंडळी शिवसेनेत  दाखल झाली. या घडामोडीची मेहकरमध्ये चांगलीच चर्चा सुरू  आहे.