शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बुलडाणा जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामावर १२,५०० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:59 AM

१,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या साथीतही मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात ९०० पैकी ५०४ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत १,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दोन हाजर मजुरांची संख्या या कामावर अधिक असल्याचे चित्र आहे.स्थानिक पातळीवरच काम मिळत असल्याने आणि अलीकडील काही वर्षांमध्ये ३२ रुपयांनी मजुरीत वाढ करण्यात आल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्ग रोहयोच्या कामाला सध्या पसंती देत असल्याचे चित्र आहे.प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामावर २ हजार मजूर कार्यरत असून, चिखली तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत १ हजार ८४ मजूर काम करत आहे. मजुरांच्या स्थलांतराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोणार तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये ६२४ मजूर कार्यरत असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद, मोताळा, खामगाव, बुलडाणा आणि मलकापूर तालुक्यात ८७६ ते ७०० मजूर सरासरी ५० ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या कामावर कार्यरत आहेत.जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसह विविध प्रशासकीय कार्यालयाच्या अखत्यारीतील ही कामे या अकुशल मजुरांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता शारीरिक अंतरही या कामावर योग्य पद्धतीने पाळल्या जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. कामे मिळत असल्याने स्थलांतरही कमी झाले आहे. नरेगातंर्गत ग्रा.पं.नी कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि तोंडावर आलेला मान्सून पाहता ग्रामपंचायतींनीही त्यांच्या अधिनस्थ असलेली कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सुचनाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अद्याप कामांना प्रारंभ केला नसल्याचे जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या नरेगा कक्षाच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी या सुचना दिल्या आहेत.मलकापुरातील अंकेक्षण रखडले! यावर्षी मलकापूर तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत होत असलेल्या कामाचे व आतापर्यंत झालेल्या एकूण खर्चाच्या संदर्भाने सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार होते. यात मजुरांच्या एकंदर स्थितीचीही पाहणी करण्यात येऊन त्यांचे म्हणणे ही विचारात घेतले जात असते. मधल्या काळात लोणार तालुक्यात झालेले सामाजिक अंकेक्षण चांगलेच गाजले होते. त्यावेळी १७ हजार मजुरांकडून काम मागणीचे अर्ज भरून घेतले होते. जिल्ह्यात १२,५०० मजूर प्रत्यक्षात या कामावर कार्यरत असून, यातील १ हजार २९४ मजुरांकडे अद्यापही युनिक आयडेंटी कार्ड नसल्याचे समोर येत आहे; मात्र जिल्ह्यातील अकुशल मजुरांना कोरोना संसर्गाच्या काळात काम मिळाल्यामुळे त्यांच्या मजुरीचाही प्रश्न निकाली निघाला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगार