शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात १.१९ क्विंटल गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:01 IST

कारमधून गांजाची तस्करी करणार्‍यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळून एक क्विंटल १९ किलो गांजा व कार जप्त केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. दरम्यान रावण टेकडी जवळील टोलनाक्याजवळ घडली. यावेळी कारमधील दोन इसम फरार झाले आहेत. तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन महिला ताब्यातकारसह ७ लाख ५९ हजार ७४४ रुपयांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कारमधून गांजाची तस्करी करणार्‍यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळून एक क्विंटल १९ किलो गांजा व कार जप्त केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. दरम्यान रावण टेकडी जवळील टोलनाक्याजवळ घडली. यावेळी कारमधील दोन इसम फरार झाले आहेत. तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांना कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहितीवरून त्यांनी जुगनू हॉटेलसमोरील चौफुलीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, अकोलाकडून येणारी कार क्रमांक एम.एच. 0२ बी.वाय. ८२२१ ही कार पोलिसांसमोर न थांबता समोर निघून गेली. यावेळी पोलिसांनी सदर कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून रावण टेकडीजवळील टोल नाक्याजवळ थांबविले. यावेळी पोलिसांना पाहून कारमधील दोघे अज्ञात इसम कार सोडून पसार झाले. तर पोलिसांनी कारमधील अरूणा भगवान जाधव (वय ३५) व उषा राजू साळवे (वय ३0) दोघी रा. वडावे बेलदार ता.मुक्ताईनगर यांची विचारपूस करून कारची तपासणी केली असता, पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये कागदात पॅकींग केलेल्या एकूण ५५ पाकिटामध्ये १ क्विंटल १९ किलो गांजा (किं. ३ लाख ५९ हजार ७४४) मिळून आला. यावेळी पोलिसांनी सदर गांजा व कार किंमत चार लाख रुपये असा ऐवज जप्त करून उपरोक्त दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. महिलांसोबत एक १0 वर्षांचा मुलगासुद्धा कारमध्ये हजर होता. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पाटील हे घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, पळून गेलेल्या दोघांमध्ये भगवान बेलदार रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर व संतोषभय्या रा. नागपूर यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधात मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 

टॅग्स :Crimeगुन्हा