शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

११४ विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:13 IST

बुलडाणा : शाळा कृती समितीच्यावतीने आंदोलन पुकारून १८ जुलै रोजी जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबीत आहे. त्यामुळे शिक्षकांचा विनावेतन काम करण्याचा प्रवास संपावा व त्यांना वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने आंदोलन पुकारून १८ जुलै रोजी जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या.राज्यातील अनेक उच्चमाध्यमिक शिक्षक बिनपगारी काम करत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेप्रमाणे उच्च माध्यमिक शाळांचे मुल्यांकन शासनाने केले आहे. तसेच १६ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल, असे असताना सुद्धा प्रत्यक्ष अनुदान देऊन पगार चालू करणे तर दुरच मात्र अद्यापही अनुदान पात्र उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शासनाने जाहीर केली नाही. यासंदर्भात आतापर्यंत कृती समितीच्यावतीने राज्याध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने जवळपास २०० आंदोलने करण्यात आली आहे. मात्र त्याच्या या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. २४ जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने निर्णय घेऊन राज्यातील विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळेच्या, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र याद्या घोषीत करुन त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून शिक्षकांनी या आंदोलनात १०० टक्के प्रतिसाद दर्शवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे धरणेमहाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी १८ जुलै रोजी धरणे आंदोलन केले. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपल्या शाळा बंद ठेवून आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च माध्य. शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन निकम, उपाध्यक्ष प्रा.अमोल डुकरे, सचिव प्रा.सुखदेव सरदार, तथा विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.