शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची ११ टक्के तुट; दुबार पेरणीचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:06 IST

11% deficit in rainfall in Buldana district : पावसाने अेाढ दिली असून जिल्ह्यातील पावसाची तुट ११ टक्क्यांवर पोहोचली आहे.

-  नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या पाच ते सात दिवसापासून पावसाने अेाढ दिली असून जिल्ह्यातील पावसाची तुट ११ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. जून महिन्यातून नऊ दिवस पाऊस पडला आहे तर जुलै महिन्यात साधारणत: १६ दिवस पाऊस पडतो. मात्र जुलै महिन्यातच पावसाने अेाढ दिली आहे. परिणामी खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्यानुषंगाने ७ जुलै पर्यंत जिल्ह्यात साधारणत: २३३.३ मिमी सरासरी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्यक्षात १३९.३ मिमीच पाऊस पडला आहे. पावसाची वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ११ टक्के तुट आहे. त्यातच प्रकल्पांमध्येही सध्या अवघा २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत ते शेतकरी स्प्रींकलरच्या माध्यमातून पीके जगविण्याा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील काही भागा तर पिकांनी आता माना टाकल्याचे एकंदरती चित्र आहे. त्यामुळे आता जर पावसाने आणखी अेाढ दिली तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती आहे. पिकांच्या वाढीच्या निर्णायक काळातच पावसाने अेाढ दिली आहे.

३० टक्के पेरण्या रखडल्याजिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरपेकी ५ लाख १४ हजार ४२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण उदिष्ठाच्या त्यात ७० टक्के आहेत. त्यामुळे अद्यापही ३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. त्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे. अशीच परिस्थिती राहली तर यंदा उत्पादन घटण्याची भीती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस