शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेची चाके मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:19 IST

जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपत्कालीन स्थितीमध्ये त्वरीत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कार्यान्वीत करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेची गती मंदावल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे यापैकी काही रुग्णवाहिका या बंद अवस्थेत असून काहींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. आधीच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण ‘रेफर टु’ करण्याचे ग्रहण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर किमानपक्षी ही सेवा गुणात्मक दर्जाने दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावे, या उद्देशाने २६ जानेवारी २०१४ पासून १०८ रुग्णवाहिकेची सेवा राज्यभर सुरू करण्यात आली आहे. सर्व जिल्हा स्तरावर हे काम बीव्हीजी या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नियामानुसार एका रुग्णवाहिकेवर एक डॉक्टर, एक चालक आणि एका परिचारकाची आवश्यकता असते. यानुसार जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या २३ रुग्णवाहिकांपैकी ५ रुग्णवाहिका बंद आहेत. सेवेत असलेल्या १८ रुग्णवाहिकांसाठी ३६ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. या रुग्वाहिकांचे कामकाज डॉक्टर तीन पाळ्यांमध्ये पाहतात. आठ तासाच्या पाळीनुसार १८ रुग्णवाहिकांसाठी आवश्यक असलेले डॉक्टर सध्या उपलब्ध आहेत. काही ठिकाणी परिचारकाचे काम रुग्णवाहिकेचे चालकच करत असल्याचे कथीतस्तरावर सांगितले जात आहे.सुरूवातीच्या काळात १०८ रुग्णवाहिकांचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या क्रमांकावर फोन करताच २० ते ३० मिनीटाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र अलीकडच्या काळात या रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे जखमींवर वेळेत उपचार न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याच्या घटनाही मधल्या काळात घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा कार्यक्षमपणे कार्यान्वीत करण्याची गरज आहे. रुग्णवाहिकांच्या समन्वयकांकडून सेवा पुरविण्यास काही कुचराई होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सकांचे आहे. त्यामुळे कामात हलगर्जी करणाऱ्या रुग्णावाहिकेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पाऊल उचलणे अपेक्षित आहे. जेणेकरून अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकेल.सध्या जिल्ह्यात २३ रूग्णवाहीकांपैकी १८ रुग्णवाहिका सेवेत आहेत. ही जबाबदारी बीव्हीजी या खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. यावर जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने आपले नियंत्रण आहे. सोबतच ही सेवा योग्य पद्धतीने दिल्या जात आहे.- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा