शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

१00 रुपयात करा वाहन ‘प्रदूषणमुक्त’!

By admin | Updated: November 24, 2015 01:21 IST

बुलडाणा येथील आरटीओ कार्यालयातील प्रकार; ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे प्रकार उघड.

बुलडाणा : आपल्याकडील वाहन धूर फेकत आहे ? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? नो प्रॉब्लम, आपले वाहन रस्त्यावरून चालताना अजिबात प्रदूषण पसरवित नाही, असे प्रमाणपत्र आपल्याला सहज मिळू शकते. वाहतूक अधिनियमानुसार प्रत्येक वाहनासाठी आवश्यक असणारे हे प्रमाणपत्र हवे असेल तर बुलडाण्यात या, अवघे १00 रुपये द्या आणि आपले वाहन प्रदूषणमुक्त करून जा.विश्‍वास बसणार नाही; पण प्रदूषणमुक्तीचा हा खेळखंडोबा सध्या बुलडाणा शहरात बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवघ्या १00 रुपयात येथील ह्यपीयूसी केंद्राह्णवर आपल्याला हमखास हे प्रदूषणमुक्तीचे प्रमाणपत्र (पावती) मिळते. लोकमतने केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण मध्ये हा प्रकार आज २३ नोव्हेंबर रोजी चव्हाट्यावर आला.रस्त्यावरून धावणार्‍या प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यातून एक वेळ वाहन प्रदूषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाला हे पीयुसी स्टिकर नसेल तर वाहतूक नियंत्रक किंवा परिवहन अधिकारी आपल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करू शकतात. त्यामुळे पीयूसी स्टिकर देणारी दुकानेच बुलडाण्यात थाटण्यात आली आहेत. परिवहन विभागाकडून त्यांना अधिकृत परवानगी असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही वाहनाची प्रत्यक्ष तपासणी न करताच येथे पीयूसी प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने केवळ कागदोपत्री प्रदूषणमुक्ती दाखविण्याचा हा प्रकार कितपत योग्य? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसून, येथे जनतेची व शासनाची फसवणूक होत आहे. १0 रुपयांचे स्टिकर १00 रुपयाला !देशाच्या सीमेवर आतंकवादी तसेच शत्रू राष्ट्राच्या सैन्याशी उडणार्‍या चकमकीत शहीद होणार्‍या देशाच्या वीर सैनिकांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी शासनाकडून भारतीय सैन्यदलातील जवानांचे फोटो असलेले स्टिकर १0 रुपयात विक्री करून सैनिक कल्याण निधी जमा केल्या जातो; मात्र लोणार येथील आरटीओ कॅम्प दरम्यान दलालाकडून भारतीय सैनिकांच्या नावाखाली १0 रुपयांचे स्टिकर ५0 ते १00 रुपयाला सक्तीने विक्री करून वाहनधारकांची आर्थिक लूट केल्याचे वास्तव येथील विश्राम गृहावर २३ नोव्हेंबर रोजी आयोजित आरटीओ कॅम्प दरम्यान 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. *असे केले स्टिंग ऑपरेशन'लोकमत' ने शहरातील परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालय परिसरात असलेल्या पीयूसी केंद्राला भेट दिली. आमच्याकडे चारचाकी वाहन असून, ते सध्या मेहकर शहरात आहे. त्याची पीयूसी मागील महिन्यात संपल्यामुळे नवीन पीयूसी काढायची आहे, असे पीयूसी केंद्रचालकाला सांगण्यात आले. त्याने केवळ वाहनाचा क्रमांक आणि वाहन पेट्रोलवर आहे की डिझेलवर एवढे विचारले; मात्र प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी वाहन दाखविण्याचा आग्रह त्याने केला नाही. पीयूसी शुल्क म्हणून १00 रुपये घेत, 'प्रदूषणविरहित वाहन' असे प्रमाणपत्र लोकमत प्रतिनिधीकडे दिले.*परिवहन अधिकार्‍यांना माहिती नाहीदरम्यान, यासंदर्भात प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्याशी संपर्क साधला, पीयूसी तपासणी केंद्र शहरात सुरु आहे किंवा नाही, याची माहिती त्यांना नव्हती. पीयूसी यंत्राद्वारे वाहनाची तपासणी करुन वाहनचालकाला प्रमाणपत्र देण्यात येते, विशेष म्हणजे यंत्राद्वारे वाहनाची तपासणी केल्याशिवाय वाहनाची पीयूसीची स्लिप बाहेर येत नाही, असे त्यांनी सांगितले.