शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात १0 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:58 IST

जिगाव प्रकल्पासह बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार जिल्ह्याला ६६५ कोटी रुपयाची मिळाली कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरा : ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आता आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहेत, असा टोला मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आमचे सरकार शेतकर्‍यांचे असून आतापयर्ंत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८४५ शेतकर्‍यांच्या खात्यात ६६५ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगून जिगाव प्रकल्पासह जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ त्यांनी केला. नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, १७ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी सरकारने सर्व प्रलंबीत प्रकल्पांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून यासाठी निधी खेचून आणला. १0८ प्रकल्पामुळे सिंचनाच्या सोयी शेतकर्‍यापयर्ंत पोहचू शकणार आहे. यासाठी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली. ३0 हजार कोटी रुपये यासाठी मंजूर झाले. जी कामे अर्धवट सोडली आहेत. ती कामे हातात घेवून पुर्णत्वात नेण्यासाठी येत्या २ वर्षात प्रयत्न केले जातील. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही कटाक्षाने काळजी घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही : नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या कामाचा शुभारंभ झाला होता ही कामे आज पुर्णत्वास येत आहेत. नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव आदी तालुक्यातील रस्ते, पूलाचे काम सुरु झाले आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव आदी शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही असे १00 टक्के गुणवत्ता असलेले रस्ते आम्ही देवू अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. 

२२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात : कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर राज्यातील २२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जिल्हयातील शेतकर्‍यांना प्राधान्य देत ६६५ कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे कुणीही दिशाभूल करू नका असा इशारा कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbuldhanaबुलडाणाNitin Gadakriनितिन गडकरी