शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड समर्पित रुग्णालयात १० टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 11:53 IST

10% beds reserved for children in Covid dedicated hospital : कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या साहाय्याने २५ टक्के बेड्सवर ऑक्सिजनची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास तिचा मुकाबला करताना आरोग्य सुविधांची कमतरता पडणार नाही, याची खरबरदारी घेत आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सज्जता वाढवत आहे. ऑक्सिजन प्लांट, अैाषधी, परामेडीकल स्टाफ याचा सर्वंकष आढावा शुक्रवारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर उपरोक्त बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात दुर्दैवाने तिसरी लाट जर आली तर किती व्यक्ती कोरोनाबाधित होऊ शकतात, लहान मुलांचे प्रमाण किती राहील या दृष्टीनेही आरोग्य यंत्रणा सध्या सर्वेक्षण करून त्यासंदर्भातील अंदाज २ जुलैला सादर करणार असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.

तीन ठिकाणी प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेडबुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५० बेडवर ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १५ या प्रमाणे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली जात आहे. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ३० बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात येत  आहेत.

१६ ऑक्सिनज प्लांटदुसऱ्या लाटेत आलेल्या आरोग्य विषयक समस्या पाहता आता जिल्ह्यात आठ शासकीय व आठ खासगी असे एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत. प्रतिदिन १७ मेट्रिक टन एवढी महत्तम क्षमता विचारात घेऊन त्यांची निर्मिती केली गेली आहे. या व्यतिरिक्त समर्पित कोविड रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांटद्वारे ८० टक्के ऑक्सिजन, तर पीएसए प्लांटद्वारे एकूण आवश्यकतेच्या २० टक्के ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे यंत्रणेचे नियोजन झाले आहे. सध्या जिल्ह्यात २६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध असून, सीएसआर फंडातून आणखी २०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध करण्यात येत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या