शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

१ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 23:15 IST

आता खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक

नानासाहेब कांडलकर - जळगाव रासायनिक खतांवर शासनाकडून अनुदान दिले जात असल्याने या खतांचा पुरवठा फक्त शेतकऱ्यांनाच व्हावा, यासाठी १ जून २०१७ पासून रासायनिक खत खरेदी करताना कृषी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कृषी केंद्रावर असलेल्या ई-पॉस मशीनवर आपल्या बोटाचा ठसा उमटविणेही गरजेचे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सन २०१७-१८ ची रासायनिक खतांची मागणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन असून, तेवढा साठा वेळोवेळी जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, तसेच खरीप ते बागायती विविध बियाणांची मागणी जिल्ह्याकरिता १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटलची असून, त्याचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी व्ही.टी. मोकाडे व जिल्हा मोहीम अधिकारी ए.ओ. चोपडे यांनी दिली.बी-बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना आधार कार्ड नंबरची गरज राहणार नाही. कारण यावर शासनाकडून अनुदान दिले जात नाही; परंतु रासायनिक खतांवर शासनाकडून सबसीडी दिली जात असल्याने रासायनिक खत निर्मितीच्या कारखानदारांना शासनाकडून तो निधी वर्ग केला जातो; परंतु तेवढे खत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प अंतर्गत आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना जे खतांचे भाव आहेत त्याच भावात खते मिळणार आहे, कारण हे भाव सबसीडी गृहित धरुनच ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणताही निधी जमा होणार नाही. प्रत्येक कृषी केंद्रावर ई-पॉस मशीन ठेवण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांना आपला बोटांचा ठसा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८५० ई-पॉस मशीन पुरविण्यात येणार आहे. कृषी केंद्रधारकांचे याबाबत प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले आहे.मागणीप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा होणारबुलडाणा जिल्ह्यात सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. तेवढा पुरवठा संबंधित कंपन्यांकडून करण्यात येणार आहे. युरिया एसएसपी, डीएपी,एमओपी, १५:१५:१५, २०:२०:१३, १०:२६:२६, १६:१६:१६, १२:१२:१६, २४:२४:०, १९:१९:१९, १७:१७:१७ अशा रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्याकरिता ११ हजार, चिखली तालुक्याकरिता १२ हजार २२५, देऊळगाव राजा १० हजार ७०, जळगाव जामोद ९ हजार ६४५, खामगाव ११ हजार ६७५, लोणार ८ हजार ७७५, मलकापूर १० हजार १२०, मेहकर १२ हजार २७५, मोताळा ९ हजार ७१५, नांदुरा ९ हजार ४५, संग्रामपूर १० हजार १००, शेगाव ९ हजार ९३० तर सिंदखेडराजा तालुक्याकरिता ११ हजार ४२५ मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज राहणार आहे. कृषी विभागाने मागणी संबंधित विभागाला दिली असून, तेवढा पुरवठा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.बियाण्यांची गरज १ लाख ३६ हजार क्विंटलचीजिल्ह्यातील सर्वाधिक लागवड ही सोयाबीन पिकाची होते. अनेक शेतकरी मागील वर्षाचे सोयाबीनचे बियाणे वापरतात तरीसुद्धा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची मागणी येत्या खरीप हंगामात १ लाख १५ हजार ५९० क्विंटलची राहणार आहे. ज्वारी बियाणे १३८० क्विंटल, बाजरी २५ क्विंटल, मका बियाणे ४५०० क्विंटल, तूर ५७३७ क्विंटल, मूग २७३० क्विंटल, उडीद २३४० क्विंटल, भूईमूग १७५ क्विंटल, तीळ ३७ क्विंटल व कापूस बियाणे ४०२५ क्विंटल एवढ्या बियाण्यांची गरज जिल्ह्याला राहणार आहे. तालुकानिहाय विचार केल्यास बुलडाणा तालुक्याला १३ हजार ६९४ क्विंटल, चिखलीला १४ हजार ९७४, देऊळगाव राजा ११ हजार ५६८ क्विंटल, जळगाव जामोद ६ हजार ४३२, खामगाव १२ हजार ८३४, लोणार ११ हजार ४८२, मलकापूर ७ हजार ७३७, मेहकर १५ हजार ५९०, मोताळा ६ हजार ५६७, नांदुरा ५ हजार ८४२, संग्रामपूर ६ हजार ६३७, शेगाव तालुक्याला ७ हजार ५०७ तर सिंदखेडराजा तालुक्याला १५ हजार ६७५ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. तेवढी मागणी नोंदविण्यात आली असून, बियाण्यांचा पूर्ण पुरवठा होणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. सिंदखेडराजा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, खामगाव या तालुक्यांची बियाण्यांची मागणी सर्वाधिक आहे. तुलनेत इतर तालुक्यांची बियाण्यांची मागणी कमी आहे. बियाण्यांवर शासन अनुदान देत नसल्याने याकरिता आधार कार्ड नंबर व ई-पॉस मशीनमध्ये बोटांचा ठसा उमटविण्याची गरज नसल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.