Kangana Ranaut calls Urmila Matondkar a 'soft porn star' - not known for her acting | कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतने इंडस्ट्रीतल्या घराणेशाही आणि गटबाजीच्या विरोधात बंड पुकारला आहे. कंगनाने उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार असे संबोधले. नुकतेच उर्मिलाने कंगनावर निशाणा साधला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, कंगना उगाचच बळी पडतेय आणि महिला कार्ड खेळते आहे. तिला जर ड्रग्सला घेऊन लढायचं आहे तर तिने याची सुरूवात तिचे राज्य हिमाचल प्रदेशमधून केली पाहिजे.

कंगना राणौतनेउर्मिला मातोंडकरवर पलटवार करत म्हणाली की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले.

मी कधीच ड्रग्स विकत घेतले नाही- कंगना
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, मला राजकारणात तिकिट मिळवण्यासाठी कोणती अडचण येणार नाही कारण उर्मिलाकडेदेखील एक आहे. जेव्हा तिला तिकिट मिळू शकते तर मला का नाही मिळू शकत. सर्वांना तिकिट मिळत आहे. मी माझ्या आयुष्यासोबत का खेळू, माझं घर का तोडलं? 
कंगनाने स्वतःला शंभर टक्के निर्मळ असल्याचं सांगत अध्ययन सुमनने केलेल्या विधानावर देखील आपलं मत सांगितले. काही वर्षांपूर्वी अध्ययने आरोप केले होते की कंगना राणौतने त्याला जबरदस्ती ड्रग्स दिले. त्यावर कंगना बोलली की, मी आतापर्यंत कोणत्या ड्रग पॅडलरला फोन केला नाही. मी कधीच ड्रग्स विकत घेतले नाही. परंतु हो, मी लोकांसमोर एक्झपोज झाली आहे तर मला ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे. मी पाहिले आहे भारताला कशाप्रकारे ड्रग्सपासून नुकसान होतंय विशेष करून पंजाबला.

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट

उर्मिला मातोंडकरने साधला कंगनावर निशाणा
कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या विधानांवर उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे.

स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...


मुंबईबद्दल अपमानास्पद वक्तव्य खपवून घेणार नाही - उर्मिला
उर्मिला पुढे म्हणाली होती की, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देतं. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. पोलिसांना ड्रग्स नेक्ससबद्दल का सांगत नाही? या गोष्टीत कोणतीही शंका नाही की मुंबई आणि बॉलिवूड सर्वांचे आहे. ज्याने या शहरावर प्रेम केले आहे आणि त्याला काहीतरी दिले आहे तर हे शहर त्यांचे आहे. या शहराची मुलगी असल्याच्या नात्याने त्याचा अपमानास्पद कोणतेही विधान ऐकून घेणार नाही. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे टीका करता तेव्हा हे शहरच नाही तर तुम्ही इथल्या लोकांचा अपमान करत आहात. उर्मिला पुढे म्हणाली की, जर कुणी प्रत्येक वेळेला ओरडतोय तर ते गरजेचे नाही की तो खरे बोलतो आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut calls Urmila Matondkar a 'soft porn star' - not known for her acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.