शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांचा असहकार आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:42 IST

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या अद्यापही जैसे थे आहेत.

ठळक मुद्देशिक्षक कृती समितीने घेतला ठराव : प्रशासनाकडून केली जात आहे बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या अद्यापही जैसे थे आहेत. त्यामुळे या समस्या मार्गी लागेपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध असहकार आंदोलन करणार आहेत. याबाबत शिक्षक कृती समितीच्या सभेत सर्वानुमते हा ठराव पारीत करण्यात आला.शिक्षक कृती समितीची सहविचार सभा पार पडल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत.त्यामुळे शिक्षकांवर कामांचा बोजा वाढत चाललेला आहे. त्यांच्या प्रलंबित समस्या निकाली निघेपर्यंत जि.प. शिक्षक आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकणार असून केवळ वेतन बिल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कार्यालयीन व्हॉटसअ‍ॅप ग्रृप सोडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सर्व पदाधिकारी व संघटना यांनी शासकीय व कार्यालयीन ग्रृप वर न राहता बाहेर पडण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आला. सर्व प्रलंबित कामे निकाली काढण्याची मागणी अद्यापही निघालेली नाही. त्यामुळे जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गाढवे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.आॅफलाईन बिलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी शिक्षकांनी केली.या सर्व समस्या मार्गी न निघाल्यास असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. या बैठकीला शिक्षक कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, सुधीर वाघमारे, मुकेश मेश्राम, संदीप वहिले, मुकुंद ठवकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, सुधाकर ब्राम्हणकर, गिरीधारी भोयर आदी उपस्थित होते.ज्येष्ठांचा सत्कारकोंढा (कोसरा) : वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय जेष्ठांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जिभकाटे होते. अतिथी म्हणून बे.तू. आगाशे, अध्यक्ष मानवसेवा संघ लाखनी, संयोजक ए.भ. पाखमोडे, कार्याध्यक्षता ह. भुरे, सचिव झा. म. नेवारे, सहसचिव ह.रा. मोहतुरे, स्रेही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्र. सी. सोनवाने, प्रार्चा सुरेश जिभकाटे यांच्या उपस्थितीत पार पडला.