शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जि.प. शाळांमधील किलबिलाट ६ मे पासून होणार बंद

By admin | Updated: April 9, 2017 00:26 IST

उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे.

उन्हाळी सुट्या : शिक्षण समितीने घेतला सर्वानुमते ठरावभंडारा : उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने त्याची झळ विद्यार्थी व शिक्षकांना सोसावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला. शुक्रवारी शिक्षण समितीच्या झालेल्या सभेत हा ठराव सर्वानुमते पारित केला. उष्णतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता १० मार्चला शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून सकाळपाळीत घेण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. आता महिन्याभरानंतर झालेल्या शुक्रवारच्या सभेत या सर्व शाळांना ६ मे पासून उन्हाळी सुट्या देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मागील वर्षी १४ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या दिल्यागेल्या होत्या. यावर्षी आठ दिवसांपुर्वी या सुट्या लागत आहे. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या शिक्षण समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे, समिती सदस्य अशोक कापगते, हेमंत कोरे, प्रणाली ठाकरे, राणी ढेंगे, वर्षा रामटेके, संगिता मुंगुसमारे, प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगणजूडे आदींसह शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उन्हाळा सुरू झाला असल्याने तापमानात वाढ होत असून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना याची झळ सोसावी लागत असल्याचा मुद्दा मुबारक सय्यद यांनी उपस्थित केला. अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावावरून शाळेत येत असतात. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. दुरवरच्या शाळेत जाताना मार्गात सोयीसुविधा नसल्याने वेळप्रसंगी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यास मदत मिळत नाही. त्यामुळे ६ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या द्याव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावर समितीने ठराव घेतला. यासोबतच खेळोत्तेजक मंडळाला नवसंजीवनी देऊन पुढील वर्षीच्या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या स्पर्धांसाठी लागणाऱ्या खर्चाचा विनियोग जिल्हा परिषद फंडातून करण्यात यावा व याकरिता एका समितीचे गठण करुन स्पर्धा पार पाडाव्या असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मंडळाच्या भविष्यात निवडणूका होणार नसल्याचाही ठराव घेण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेची मदत घेण्याचाही मुद्दा यावेळी उपस्थीत करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी द्यावा, अशी मागणी या सभेत लावून धरण्यात आली. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची तरतूदशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेकदा पैशाची अडचण भासते त्यामुळे अशा होतकरु व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्याचा खर्च उचलावा, असा मुद्या मुबारक सय्यद यांनी लावून धरला. त्यावर सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.मागण्यांना समितीचा पाठिंबाजिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून शिक्षक संघटना जिल्हा परिषद प्रशासनाविरुध्द लढा देत आहेत. हक्क असतानाही त्यांच्या मागण्यांना केवळ आश्वासन दिले जात आहे. या मागण्या न्याय असून शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून यानंतर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिक्षकांच्या मागण्यांना शिक्षण समितीचा पूर्ण पांिठंबा असल्याचेही या सभेत उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी सांगितली.