शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जि.प. पोटनिवडणुकीत बोरकर, कोकुर्डे विजयी

By admin | Updated: November 24, 2014 22:51 IST

पहेला आणि सिहोरा या दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. एक जागा कायम राखत आणि शिवसेनेकडे असलेली जागा हिरावत

जि.प. पोटनिवडणूक : शिवसेनेची जागा भाजपने हिरावलीभंडारा/सिहोरा : पहेला आणि सिहोरा या दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. एक जागा कायम राखत आणि शिवसेनेकडे असलेली जागा हिरावत आपला भाजपने वर्चस्व टिकवून ठेवले आहे. पहेला क्षेत्रातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले दीपक गजभिये यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजीनामा दिला होता तर सिहोरा क्षेत्रातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले शोभा चांदेवार यांचे निधन झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या. ही निवडणूक रविवारला झाली आज मतमोजणी प्रक्रिया आटोपली.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पहेला क्षेत्रात भाजपकडून किशोर बोरकर, शिवसेनेकडून यशवंत भोयर आणि काँग्रेसकडून नरेंद्र रामटेके असे तीन उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे किशोर बोरकर हे १,९२१ मतांनी विजयी झाले. बोरकर यांना ४,५३८, सेनेचे भोयर यांना २,६१७ तर काँग्रेसचे रामटेके यांना १,९९४ मते मिळाली. ‘नोटा’ ला १५४ मते मिळाली. असे एकूण ९,३०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भंडारा तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. भाजपचे बोरकर यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भंडाऱ्यात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी नितीन कडव, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, जिल्हा परिषदेचे सभापती अरविंद भालाधरे, आरीफ पटेल, प्रशांत खोब्रागडे, सुभाज आजबले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पहेला येथे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महिला राखीव असलेल्या सिहोरा क्षेत्रात भाजपकडून आशा कोकुडे आणि काँग्रेसकडून कविता घोडीचोर असे दोनच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपच्या आशा कोकुडे या १,८७७ मतांनी विजयी झाल्या. कोकुडे यांना ४,७४१ तर काँग्रेसच्या घोडीचोर यांना २,८६४ मते मिळाली. ‘नोटा’ ला १४७ मते मिळाली. असे एकूण ७,७५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रात १३ गावांचा समावेश असून या निवडणुकीत १७ बुथ होते. तुमसर तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. भाजपचे कोकुडे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर तुमसरात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर सिहोरा येथे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पंचायत समितीचे सभापती कलाम शेख, हिरालाल नागपूरे, बंटी बानेवार, बळीराम भोंगाडे, मच्छेराचे सरपंच योगेश कोकुडे, बबलू शरणागत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)