शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग ऑक्सिजनवर! १६ पैकी १४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 18:37 IST

Bhandara News जिल्हा परिषद येथे महत्त्वपूर्ण विभागात गणल्या जाणाऱ्या समाजकल्याण विभागात मंजूर १६ पैकी १४ पदे रिक्त आहेत. केवळ दोन कर्मचारी समाजकल्याणचा डोलारा सांभाळत आहेत.

देवानंद नंदेश्वर भंडारा : जिल्हा परिषद येथे महत्त्वपूर्ण विभागात गणल्या जाणाऱ्या समाजकल्याण विभागात मंजूर १६ पैकी १४ पदे रिक्त आहेत. केवळ दोन कर्मचारी समाजकल्याणचा डोलारा सांभाळत आहेत. सध्या हा विभाग ऑक्सिजनवर असून शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण कसे होईल, असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी अविनाश रामटके यांची २०१५ मध्ये बदली होऊन नऊ वर्षे लोटले असताना अद्यापही शासनाने त्यांच्या जागी नियमित अधिकारी पाठविला नाही. या विभागाचा पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. प्रभारी समाजकल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे आपला पूर्णवेळ या विभागाला देऊ शकत नाहीत. अधिकाधिक वेळ देत असल्याचा त्यांचा दावा असला तरी त्यांचे महिला बालकल्याण विभागाकडे अधिक लक्ष असते. त्यामुळे ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजना मागासवर्गीयांना वरदान ठरतात. शिवाय दलित वस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी दरवर्षी शासनाकडून येतो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी सायकली वाटप केल्या जातात. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती, ईबीसी सवलत, वसतिगृहाची तपासणी, अंध, अपंग शाळांना अनुदान देणे आदी महत्त्वाची कामे याच विभागाला करावी लागतात. या विभागाचा डोलारा जर प्रभारीवरच चालत असेल तर विविध कल्याणकारी योजना कशा राबवायच्या? असा प्रश्न आहे.समाजकल्याणचा डोलारा प्रभारींवर!मागासवर्गीयांचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्यात येतात; मात्र २०१५पासून भंडारा जिल्हा परिषदेच्या पदावर अधिकाऱ्याची नियुक्तीच न झाल्यामुळे या पदाचा कार्यभार प्रभारींच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. प्रभारी व्यक्तीकडे त्यांच्या पदाची असलेली कामे सांभाळून प्रभारीपदाचा कारभार पाहत असताना अनेक निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय प्रशासनाच्या गतिमान कारभारालाही खीळ बसत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद