समाजकल्याणसाठी एक कोटी : प्रशासकीय खर्चासाठी १.३० कोटी, ग्रामपंचायतींसाठी १.२२ कोटीभंडारा : ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेचा सन २०१६-१७ चा ५.६९ कोटी रूपयांचे शिलकीचा अंदाजपत्रक अर्थ सभापती राजेश डोंगरे यांनी मंगळवारी सादर केला. सन २०१५-१६ मध्ये सादर केलेला अर्थसंकल्प ११ कोटींचा होता. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात तूट आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती राजेश डोंगरे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाज कल्याण विभागासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली. पाणीपट्टीत १६ लाखांची घट दाखविण्यात आली. बांधकाम विभागांतर्गत विविध इमारतींच्या परिरक्षण व देखभाल दुरूस्तीसाठी ५७ लाखांची तरतुद करण्यात आली असून प्रशासनावरील खर्च भागविण्यासाठी सामान्य प्रशासनाला १ कोटी ३० लाखांची तरतुद केली आहे. ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्कातून प्राप्त होणाऱ्या निधीपैकी १ कोटी २२ लाख रूपये देण्यात येणार आहे.सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे सभापती, संवर्ग विकास अधिकारी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.सन २०१५-१६ मध्ये अंतिम सुधारित अंदाजपत्रकात महसुली जमा ६ कोटी १९ लाख २६ हजारांचा होता. व महसुलीप्रमाणे सुरूवातीची शिल्लक ५ कोटी ४० हजार ९३ रूपये असे एकूण ११ कोटी ६० लाख १९ हजार रूपये महसुली जमा होते. ८ कोटी ७९ लाख २३ हजार ९५५ रूपये असे २० कोटी ३९ लाख ४२ हजार ९५५ रूपये घेण्यात आली आहे. यात महसुली खर्च ११ कोटी २४ लाख १९ हजार व भांडवल खर्च ७ कोटी ५६ लाख ३८ हजार ९५५ असे १८ कोटी ८० लाख ५७ हजार ९५५ रूपयांचा होता. सन २०१६-१७ चा प्रस्तावित अंदाजपत्रकात महसुली जमा ५ कोटी ३३ लाख ३१ हजार व महसुल प्रमाणे सुरूवातीची शिल्लक ३६ लाख असे मिळून एकुण महसुली जमा ५ कोटी ६९ हजार ३१ रूपये आणि भांडवली जमा ४ कोटी ६३ लाख ५६ हजार असे १० कोटी ३२ लाख ८७ हजार. महसुली खर्च ५ कोटी ६७ लाख ९१ हजार, भांडवली खर्च ४ कोटी ६३ लाख असे १० कोटी ३० लाख ९१ हजार अशी रक्कम घेण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)पाणीपट्टीत १६ लाखांची घटग्रामीण पाणी पुरवठा विभागात या योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेचा २० टक्के हिस्सा आहे. यात मागिल वर्षीचा अखर्चित निधी समाविष्ठ असल्याने अंदाजपत्रकात वाढ दिसून येत आहे. यात शासन पाणीपट्टीची ४१ लाखांऐवजी २५ लाख प्राप्त होणार आहे. त्यामुळे १६ लाखांची घट निर्माण झालेली आहे.समाजकल्याण विभागात आर्थिक वर्षात मागील थकीत अनुशेषासह समाजकल्याण विभागातील योजनेकरिता २० टक्के हिस्सा व अपंग कल्याण योजनेचा तीन टक्के हिस्सा मिळून समाजकल्याण विभागाला १ कोटी ९ लाख ५७ हजारची तरतुद करण्यात आली. सन २०१६-१७ साठी अंदाजपत्रकामध्ये ६४ लाख १५ हजार रूपयांची तरतुद करण्यात आली.महिला व बालकल्याण विभागात सन २०१५-१६ या वर्षाकरिता मागील थकीत अनुशेष धरून ६० लाख रूपये देण्यात आलेला आहे. व प्रस्तावित सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये २७ लाख १५ हजार रूपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रकात प्रत्येक विभागाच्या योजनेकरिता त्यांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, सन २०१६-१७ चे प्रस्तावित सुधारित अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेला प्राप्त होणारे कमी अनुदान, तसेच इतर उत्पन्नाच्या बाबी नसल्यामुळे विभागनिहाय व प्रमुख योजनानिहाय त्यांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध देण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला आहे.- राजेश डोंगरेसभापती, जिल्हा परिषद, भंडारा
जिल्हा परिषदेचा ५.६९ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक
By admin | Updated: March 26, 2016 00:23 IST