शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

जिल्हा परिषद कर्मचारी आता ‘नजर’ कैदेत

By admin | Updated: February 9, 2015 23:07 IST

जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी

भंडारा : जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेरातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल.जिल्हा परिषदेतील कर्मचारी सकाळी कर्तव्यावर आल्यानंतर सायंकाळी ५.४५ पर्यंत कार्यालयात हजर राहून कर्तव्य पार पाडणे गरजे आहे. दरम्यान त्यांना दुपारी २ वाजता अर्धा तासाचा 'लंच ब्रेक' दिल्या जातो. मात्र, अनेक कर्मचारी वेळेचा दुरूपयोग करताना आढळून येत होते. यामुळे कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या नारिकांना कर्मचारी टेबलवर दिसून येत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होत होता. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी इमारतीच्या तळमजल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वगळता उर्वरीत तीन चॅनल गेट सकाळी १०.३० वाजेपासून कार्यालयीन वेळ होईपर्यंत बंद ठेवण्यात येतात.यानंतरही कर्मचाऱ्यांचे टेबल सोडून जाण्याचा उपक्रम सुरूच असल्याने मुख्य प्रवेशद्वारावर एक कर्मचारी बसवून बाहेर जाणाऱ्यांची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे. आता कर्मचाऱ्याची कर्तव्यात किती पारदर्शक आहेत. याची माहिती व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी चौदा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. यात आणखी वाढ करण्यात आली असून सात नवीन कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. हे कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, व्हरांड्यात तथा काही महत्वाच्या विभागात लावण्यात आलेले आहेत. कॅमेरातून सीईओ कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणार आहे. याचे नियंत्रण ते आपल्या कक्षातून करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरामुळे आता जिल्हा परिषदमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांवर बारीक नजर राहणार आहे. कॅमेरा लावण्यात आल्याने काही कर्मचाऱ्यांची मोठी गोची झाली असून काहींनी यामुळे पारदर्शक कामे होतील व कामचुकाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार असल्याने स्वागत केले आहे. यानंतर काही दिवसात येथील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.(शहर प्रतिनिधी)