शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलाव पुनरूज्जीवनासाठी प्रशासन उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

ठळक मुद्देजलसंकट : ६१७ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारातील गावागावांतील तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना शून्य दिसत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांचा समावेश आहे. वेळीच या तलावांचे पुनरूज्जीवन केल्यास कृती आराखड्यातील लाखो रुपयांचा निधी वाचू शकतो. परंतु दरवर्षी कृती आराखडा तयार करणारे प्रशासन तलावांच्या पुनरूज्जीवनाकडे मात्र लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.भंडारा जिल्ह्यात १३०० च्या वर तलाव आहेत. माजी मालगुजारी तलावांची सध्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. परंतु निधीअभावी या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात एक तलाव हमखास आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनासोबत भूगर्भातील जलस्तर वाढण्यात होतो. मात्र अलिकडे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडूंब दिसणारे तलाव उन्हाळा आला की कोरडे पडायला लागतात. जिल्ह्यातील या तलावातील गाळ काढण्यासाठी तीन वर्षापूर्वी विशेष उपाययोजना करण्यात आली. परंतु ती प्रभावीपणे राबविण्यात आली नाही.आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. एकीकडे शासनाने भंडारा जिल्हा टँकरमुक्त म्हणून घोषीत केला आहे. परंतु जिल्ह्यातील तब्बल ६१७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे खुद्द पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातच दिसत आहे. प्रशासनाने १२ लाख ९० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विहिर खोलीकरण, गाळ काढणे, विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिर, नवीन कूपनलीका आदींचा समावेश आहे.मात्र मालगुजारी काळापासून गावाजवळ असलेल्या तलावांकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्यासारखे दिसत आहे.शासनाकडे निधीची मागणी करूनही पुरेसा निधी मिळत नाही. अनेक तलावांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. २५ ते ३० हेक्टरचे असणारे तलाव आता २ ते ३ एकरात सामावले आहेत. या तलावांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष प्रयत्न केले तर भंडारा जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात येईल आणि सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.३०० वर्षापूर्वीचे मामा तलावभंडारा परिसरावर ३०० वर्षापूर्वी गोंड राजाचे साम्राज्य होते. आजही त्याच्या पाऊलखुणा दिसून येतात. साधारणत: ३०० वर्षापूर्वी या तलावांची निर्मिती करण्यात आली. पूर्वी सर्वाधिक तलाव भंडारा जिल्ह्यात होते. आता जिल्ह्याचे विभाजन झाल्याने साधारणत: १३०० तलाव आजही जिल्ह्यात आहेत. या सर्व तलावांना माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :water shortageपाणीकपात