शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा सोंड्याटोला प्रकल्पात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:05 IST

Bhandara : तुमसर तालुक्यातील बावणथडी नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरणात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील बावणथडी नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश मोरेश्वर आंबेडारे (२८) असे या तरूणाचे नाव असून तो वारपिंडकेपार (ता. तुमसर) या गावचा आहे.

सक्करधरा गावाच्या शिवारातील खाजगी वीट भट्टीवर मजूर म्हणून राजेश कामावर होता. मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरणात मासे पकडण्यासाठी गेला होता. परंतु धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. प्रकल्पाच्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने नदीच्या पात्रात जाण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्रकल्प स्थळातून पाण्याचा उपसा सुरू झाला आहे. धरण मार्ग मध्यप्रदेशातील गावांना जोडण्यात आल्याने वाहतुकीची वर्दळ असते. दुपारनंतर धरणातील पाण्यात राजेशचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसून आला आहे. त्यांनी प्रकल्प स्थळावरील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना माहिती कळविली. चौकशीनंतर तयाची ओळख पटली.राजेशच्या कुटुंबात पत्नी आणि दीड वर्षीय मुलगा आहे. वीट भट्टीवर मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह राजेश करीत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या राजेशच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. 

प्रकल्पातील डोह धोकदायकप्रकल्पाच्या उर्ध्व भागात अनेक डोह आहेत. या डोहात मासोळ्या पकडण्याचे काम अनेक तरुण करतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. धरण आणि डोह धोकादायक असताना कुणी जुमानत नाहीत. मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे हकनाक जीव गेले आहेत. यापूर्वी अशा अनेक घटना धरणात घडलेल्या आहेत. प्रकल्पाचे उर्ध्व भागात आणि धरणाच्या पाण्यात मासेमारी प्रतिबंधित असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मासेमारी सुरूच आहे. पाटबंधारे विभागाने कठोर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा