शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कान्होबा विसर्जनासाठी स्वत:च्या आचरणातून तरूणाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये ...

ठळक मुद्देप्रशासनाने दखल घेण्याची गरज । इको फ्रेंडली मूर्तींसाठी नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मिस्किन टँक, वैनगंगा नदीघाटावर विसर्जनाच्या दिवशी अस्वच्छता असते. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यामध्ये फारसा बदल होत नसल्याने यावर स्वत:च तोडगा काढण्यासाठी शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील रहिवासी विवेक रविंद्र मेश्राम या उच्च शिक्षित तरूणाने कान्होबा घरच्या घरी मूर्ती विसर्जन करून आदर्श निर्माण केला आहे.नदीघाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या शहरवासीयांची संख्या लक्षात घेता हार, फुले, प्रसाद, भुजली, धान्य यासर्वांमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होते आणि सणाच्या उत्सवाला बाधा निर्माण होते. त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी मेश्राम यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळींना हा प्रश्न सतावत होता. मात्र यासाठी काय करता येईल, त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कानोबा विसर्जनासाठी नदीमध्ये, तलावामध्ये मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम पानवठा तयार करून त्यामध्ये विसर्जन करण्याचा आग्रह धरला.त्याची सुरवात त्यांनी आपल्यापासून करत आपल्या मित्रांच्या साक्षिने घरच्या घरी पूजा, अर्चा झाल्यानंतर विसर्जन एका मोठ्या भांड्यामध्ये करून आदर्श तयार केला आहे. हाच आदर्श इतर नागरिकांनीही व प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणावर आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध भागात कृत्रिम पानवठे, तलावांची निर्मिती करून निर्माल्य साहित्यासाठी वॉर्डनिहाय गाड्या पाठवून कचरा गोळा करण्याची गरज आहे.अन्नदानावर केला खर्चसण, उत्सव हे आनंद देण्यासाठी येतात परंतु अलीकडे बदललेल्या जीवनशैलीने उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.ते बदलण्यासाठी घरी जेवणासाठी मित्रमंडळी,गरजंूना अन्नदान करुन विर्सजणाची वेगळी सुरवात केल्याचे विवेक मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरण