विजेच्या धक्क्याने तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:37 AM2021-05-19T04:37:00+5:302021-05-19T04:37:00+5:30

सुनील गहाणे (३३, रा. पिंपळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ताे गावातील वीज खांबावर चढून वीज दुरुस्तीचे ...

Young man killed by electric shock | विजेच्या धक्क्याने तरुण ठार

विजेच्या धक्क्याने तरुण ठार

googlenewsNext

सुनील गहाणे (३३, रा. पिंपळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ताे गावातील वीज खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत हाेता. वीज प्रवाह बंद न करता दुरुस्ती करण्यासाठी ताे चढला असल्याची माहिती आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला आणि ताे खांबावरून खाली काेसळला. त्यात त्याला जबर मार लागला. ही माहिती हाेताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती लाखांदूर पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद घेतली आहे. अधिक तपास ठाणेदार मनाेहर काेरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ग्रामीण भागात वेळेवर वायरमन येत नसल्याने अनेकदा गावातील तरुणच वीज दुरुस्तीचे कामे करतात.

Web Title: Young man killed by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.