लाखांदूर (भंडारा) : रात्रीच्या वेळी घराच्या छतावर झोपलेला तरुण पहाटे दरम्यान लघुशंकेसाठी उठला. यावेळी अंदाज न आल्याने तो छतावरून खाली कोसळला. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. रवींद्र वासुदेव ठेंगडी (४०) रा. सोनी असे मृत तरुणाचे नाव आहे. ठेंगडी यांच्या घरातील विद्युत पंखा बिघडल्याने रात्री छतावर झोपण्यासाठी गेले.मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंकेसाठी जात असता छताचा अंदाज न आल्याने ते खाली पडले. आवाजानंतर कुटुंबीय व घराशेजारील नागरिक जागे झाले. यावेळी रवींद्रला गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत आहे. मात्र यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परीवार आहे.
छतावरून खाली पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:35 IST