शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

भंडारा : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आरटी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव करण्यात आलेल्या २५ टक्के ...

भंडारा : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आरटी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव करण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर ११ जून म्हणजे शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र गतवर्षी कोरोनामुळे अभ्यासाविना गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष असेच गेले. या वर्षीही तशीच परिस्थिती राहणार काय, असा सवाल व चर्चा पालकांमध्ये होऊ लागली आहे.

यंदा आरटीई अंतर्गत राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ६८३ विद्यार्थ्यांची नावे वेटिंग लिस्ट अंतर्गत आहे. नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने २,०५१ अर्ज प्राप्त झाले होते. आता ११ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यात गतवर्षीप्रमाणे गरीब विद्यार्थी अभ्यासाविना तर राहणार नाही ना अशी चर्चा पालकांमध्ये होत आहे.

बॉक्स

जिल्हा पातळीवर आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश दिला जाईल, यात कुठलीही शंका नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांजवळ अभ्यासासाठी कुठलेही साधने उपलब्ध नसतात. डिजिटल शिक्षणाबाबत तर ते कोसो दूर असतात. अशावेळी शिक्षण विभागामार्फत त्यांना साधनेही उपलब्ध करून द्यायला हवीत. मात्र तसे कधीच झालेले नाही.

गरिबांसाठी राज्य शासनाने आरटीई ॲक्ट आणला, ही चांगली बाब आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी काळाची गरज आहे. कोरोना महामारी तर ही अत्यंत निकषपूर्ण बाब आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या पाल्यांना तंत्रयुक्त शिक्षण देण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आधीच शासनाकरवी शाळांना आरटीईची रक्कम मिळालेली नाही.

बॉक्स

राज्य शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले. आरटीईअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांचे वर्ष वाया गेले, असेच म्हणावे लागेल. यावर्षी तरी असे व्हायला नको.

-विनोद रामटेके, लाखांदूर

ऑनलाइन पद्धतीने माझ्या पाल्याचा प्रवेश केला होता. मात्र कोरोनामुळे शाळाच भरली नाही. आता पुन्हा यावर्षीही तशीच स्थिती राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे शासनाने साधने उपलब्ध करून द्यायला हवीत.

- ममता कारेमोरे, भंडारा

यावर्षी माझ्या पाल्याच्या प्रवेश आरटी अंतर्गत करणार आहे. मात्र गतवर्षी शाळाच उघडली नाही. या सत्रात तरी शाळा उघडेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. शासनाने यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे.

- सचिन शेंडे, भंडारा.

बॉक्स

आरटीई अंतर्गत यावर्षी प्रवेशासाठी ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भंडारा तालुक्यात २३७, लाखांदूर १९, लाखनी ७१, मोहाडी ११८, पवनी ७७, साकोली ८६ तर तुमसर तालुक्यातील १७६ विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. सदर प्रवेश भंडारा तालुक्यातील २७, लाखांदूर ४, लाखनी ९, मोहाडी १६, पवनी १२, साकोली १० तसेच तुमसर तालुक्यातील १६ शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे.