लोकमत न्यूज नेटवर्कजवाहनगर : गावातील सांडपाणी सार्वजनिक नालीद्वारे योग्य नियोजन करुन गावातील रहदारीच्या शेवटच्या टोकाला पोहचविणे गरजेचे आहे. मात्र परसोडी येथे तसे न करता पेंच प्रकल्प खरबी-परसोडी नहर फोडून सांडपाण्याची विल्हेवाट लावली. परिणामी नहरालगतच पाणी साचल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपणारे गाव म्हणजे परसोडी. या गावची लोकसंख्या तीन हजाराच्या घरात आहे. येथील सरपंच, उपसरपंच पायउतार झाल्याने प्रशासक आहेत. गावातील काही नागरिकांनी गैरमार्गाचा वापर करीत गावातील रहदारीचे सांडपाणी खरबी-परसोडी नहर फोडून पाण्याची विल्हेवाट लावली. परिणामी या नहरात दुरुवरपर्यंत गावातच डबक्या स्वरुपात पाणी साचल्याने दुर्गंधी येत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खरबी पेंच प्रकल्प शाखा येथील कर्मचारी- अधिकारी यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नहराची नासधुस होत आहे. कालांतराने शेतीसाठी पाण्याची गरज भासल्यास पेंच प्रकल्पाचे पाणी फोडलेल्या नहरामधील ठिकाणाहून गावातील रहदारीत शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहूना शेतकऱ्यांना वेळेवर पिकाला वाचविण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर आळा घालणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. सांडपाण्याची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र याकडे अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात होते.
सांडपाण्यासाठी नहर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:34 IST
गावातील सांडपाणी सार्वजनिक नालीद्वारे योग्य नियोजन करुन गावातील रहदारीच्या शेवटच्या टोकाला पोहचविणे गरजेचे आहे. मात्र परसोडी येथे तसे न करता पेंच प्रकल्प खरबी-परसोडी नहर फोडून सांडपाण्याची विल्हेवाट लावली. परिणामी नहरालगतच पाणी साचल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सांडपाण्यासाठी नहर फोडले
ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : नहरालगतच्या विहिरीत दूषित पाणी