१ जुलैपासून जीएसटी लागू होणार : निनावे यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शासनाने १ जुलैपासून देशभरातील १७ प्रकारचे कर एकत्र करून एक राष्ट्र एक कर अशाप्रकारे सुधारणा करून नवीन वस्तु व सेवाकर कायद्यात जीएसटी करण्यात आला आहे. त्यासंबंधी व्यापारी वर्गाला माहिती देतानी प्रस्तावित कर वस्तु व सेवा कर कायद्यात ग्राहक व व्यापारी वर्गाचे हित जोपासल्या जाणार आहे. कायदा लागू झाल्यानंतर महागाईत वाढ होणार नाही, असे प्रतिपादन सहायक विक्रीकर आयुक्त पी.ई. निनावे यांनी केले.व्यापारी संघ पवनी व विक्रीकर विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने एमटीएससी पर्यटन संकुल सभागृहात कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विक्रीकर अधिकारी गोपालराव बावणे, प्रशांत घोडगे, सुशांत नेरकर, वासनिक, बरडे, राजेश राऊत, विजय बावनकर, पी.बी. फुंडे उपस्थित होते.प्रविण निनावे म्हणाले, व्यापारी व ग्राहकांनी वस्तु व सेवाकर कायद्याबाबद घाबरण्याचे काहीच कारण नाही. जीएसटीमध्ये कर दराचे स्लॅब ठेवण्यात आले आहे. नवीन कायद्यानुसार वस्तुचे दर वाढणार नाही. त्याचप्रमाणे वस्तु कोण्याही राज्यातून घेतली तरी सारख्याच किंमतीला मिळणार आहे.वासनिक म्हणाले, व्यापाऱ्यांची २० लाख पेक्षा जास्त उलाढाल आहे. त्यांना जीएसटी काढणे आवश्यक आहे. या कायद्यातून पेट्रोलीयम पदार्थ हे दोन वस्तु जीएसटीतून बाहेर ठेवण्यात आले. नवीन कायद्यासंबंधी प्रोजेक्टरवर मार्गदर्शन बावणे विक्रीकर अधीक्षक यांनी केले असून व्यापाऱ्यांना फारच सोप्या पद्धतीने जीएसटी संबंधी माहिती दिली असून व्यापाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिली.यावेळी शहरातील व्यापारी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन प्रकाश नखाते यांनी केले. आभार प्रदर्शन व्यापारी संघ पवनीचे सचिव प्रशांत पिसे यांनी केले.
वस्तु, सेवाकर कायद्यावर कार्यशाळा
By admin | Updated: May 18, 2017 00:36 IST