शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

नोकरी ही शिक्षकांसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:03 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देव्ही.यु. डायगव्हाने : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन

आॅनलाईन लोकमतभंडारा : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शिक्षकी नोकरी ही शिक्षकांसाठी अंधकारमय ठरणारी आहे. नोकरी टिकविणे व मराठी शाळा वाचविणे ही शिक्षकांसाठी तारेवरची कसरत ठरणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माजी आ. व्ही. यु. डायगव्हाने यांनी केले.तुमसर येथील आर.एस.जी.के. अग्रवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हा अधिवेशन पार पडले. यावेळी डायगव्हाने बोलत होते. अधिवेशनाला प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे, श्रीधर खेडीकर, राजेश धुर्वे, ओ.बी. गायधने, के.आर. ठवरे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, संजय वारकर, टी.डी. मारबते, अनिल गोतमारे, विद्यालयाचे प्राचार्य कमलानंद पप्पुलवार यांची उपस्थिती होती.यावेळी डायगव्हाने यांनी सध्याची शिक्षण प्रणाली ही उद्योगपती व ठेकेदारांची मक्तेदारी बनत चालली आहे. शिक्षण संघातून निवडून येणारा शिक्षक आमदार भविष्यात दिसणार नाही. या माध्यमातून शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप डायगव्हाने यांनी यावेळी व्यक्त केला.भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी संघटनेचा लेखाजोखा सादर केला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात एन.टी. तितीरमारे, रामचंद्र ठाकूर, कुंदन बोरकर, रामदयाल पारधी, अरविंद कारेमोरे, राजकुमार बांते, संजय वारकर, राजेश धुर्वे, अनिल गोतमारे, तुकाराम बांते, भिष्मा टेंभुर्णे यांचा समावेश होता. या अधिवेशनात शैक्षणिक समस्यावर व शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन बदलाबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी सुधाकर अडबाले यांनी, गोर-गरीबांचे शिक्षण हिकावून ही सरकार उद्योगपतींच्या हातात शिक्षण प्रणाली देत असल्याचा आरोप केला.या अधिवेशनात शिक्षण विषयक विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान भंडारा जिल्ह्याची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एम. वालदे, एस.पी. साखरे यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. अनंत जायभाये यांच्या समारोपीय भाषणाने अधिवेशनाची सांगता करण्यात आली. अविधेशनासाठी तुमसर शहर, तालुका कार्यकारणी तथा जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.