कुरैशी यांचे आवाहन : कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेशतुमसर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील दोन वर्षात केंद्र सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांची माहिती गाव खेड्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले.भाजप विधानसभा क्षेत्र बुथ कार्यकर्त्यांच्या तुमसर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल सोले, डॉ.प्रकाश मालगावे, प्रदीप पडोळे, राजेश बांते उपस्थित होते. मेळाव्याची सांगता खासदार नाना पटोले यांच्या भाषणाने झाली. मेळाव्यात डॉ.गोविंद कोडवानी यांनी मोदी सरकारचा दोन वर्षाची यशस्वी चलचित्र सादर केले. मेळाव्यात केंद्र सरकारच्या योजना जनधन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्व.प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात योजना, अटल पेंशन योजना, स्वच्छ भारत योजना, प्रधानमंत्री पीक विमा, उज्जवल योजना, उजाला योजनेची माहिती प्रमुख नेत्यांनी दिली. याप्रसंगी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात मुंढरी येथील करीम अंसारी यांच्या नेतृत्वात वासुदेव गोमासे, मुकाजी शेंडे, बंडू लाडसे, काटीचे भास्कर बुधे, रोशन सेलोकर, गुलाब बोंदरे, खुशाल तितीरमारे, आसलपाणीचे उपसरपंच अंशलाल गौपाले, देव्हाडा खुर्दचे ज्ञानेश्वर मुटकुरे, भैय्यालाल बुद्धे, ज्ञानेश्वर ढेंगे, बंडू धोटे, मांढळचे उपसरपंच डॉ.धनपाल शेंडे, सोनपुरीचे लिलाधर चांदेवार, पिटेसूरचे मनोज कैताडे, टांगाच्या माजी सरपंच अनिता बुधे यांचा समावेश आहे. संचालन डॉ.युवराज जमईवार तर आभार तालुकाध्यक्ष राजेश पटले यांनी मानले. यावेळी गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, भजवान चांदेवार, बंडू बनकर, सुनिल लांजेवार, निशीकांत ईलमे, मयूरध्वज गौतम, मुन्ना पुंडे, रमेश पारधी, पं.स. सभापती कविता बनकर, राणी ढेंगे, मंजुषा गभणे, निलीमा इलमे, हरिश्चंद्र बंधाटे, बाबू ठवकर, विजय जायस्वाल, प्रमोद घरडे, कैलाश पडोळे, संदीप टाले, ललीत शुक्ला, कैलाश जोशी, प्रशांत शेंडे, राजू गायधने, पल्लवी कटरे,विक्रम लांजेवार, अमित चौधरी, अमर टेंभरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनो, लोकहिताची माहिती पोहोचवा
By admin | Updated: June 12, 2016 00:20 IST