दयाराम कापगते यांचे मत : विविध ठिकाणी कार्यक्रमइसापूर : समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असून पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. आधुनिक काळात पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी असून बंदुकीतून एकदा निघून गेलेली गोळी ज्याप्रमाणे परत घेता येत नाही. त्याचप्रमाणे पत्रकाराने वर्तमानपत्रात छापलेली बातमी असते. त्यामुळे पत्रकारांनी भान ठेऊन सत्याची शहनिशा करुनच लिखाण करावे, असे प्रतिपादन माजी आमदार दयाराम कापगते यांनी केले. ते नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात पत्रकारदिनी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.उद्घाटन प्राचार्य बलवीर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.उभापती अरविंद शिवणकर, डॉ. चेतन जाधव, सरपंच ल्ीाना डोंगरवार, उपसरपंच धर्मेश जायस्वाल, डॉ. बाबू कोसरकर, मुलचंद गुप्ता, शैलेश जायस्वाल, पं.स. अभियंता कचरे, राजकुमारसिंह गौतम, वासुदेव साधवानी, सतीश कोसरकर उपस्थित होते.यावेळी दयाराम कापगते, पक्षितजज्ञ भीमसेन डोंगरवार, संतोष रोकडे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, प्राचार्य बलवीर, एस.एस. चव्हाण, समाजसेवक धनिराम नाकाडे, सुनील चांदुरकर, डॉ. नत्थू कोसरकर, प्रगतिशील शेतकरी योगराज हलमारे, शैलेष जायस्वाल, सतीश कोसरकर, बाबुलाल नेवारे, हिरासिंह गौतम, राधेश्याम भेंडारकर, डॉ. चेतन जाधव, सुरेंद्रकुमार ठवरे, संतोष बुकावन, राजकुमारसिंह गौतम, वासुदेव साधवानी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी ईशा राऊत, आस्था बोरकर, प्रगती पवार, रुची रहांगडाले, हेमलता सिरसाटे, पूनम वटी यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. संचालन करून प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर यांनी मांडले. आभार तालुकाध्यक्ष संतोष रोकडे यांनी मानले. यशस्वितेसाठी बाबुलाल नेवारे, हिरासिंह गौतम, एस.एस. चव्हाण, शामकुंवर, रामटेके यांनी सहकार्य केले.मराठी पत्रकार संघसडक अर्जुनी : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक प्राचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरु केले. या निमित्ताने सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारीला कोहमारा येथील एरिया ५१ येथे पत्रकार दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.उद्घाटन डुग्गीपार ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृउबासचे संचालक व न.पं. सदस्य देवचंद तरोणे, दिनेशकुमार अग्रवाल, मोहनकुमार शर्मा, ओमप्रकाश टेंभुर्णे, शिक्षक कापगते, शिक्षिका नंदेश्वर, शालिकराम शहारे उपस्थित होते. प्रास्ताविक निशांत राऊत यांनी मांडले. संचालन बिरला गणवीर यांनी केले. आभार जे.बी. मुनेश्वर यांनी मानले. यशस्वितेसाठी कवडूसिंग बैस, मनोज गायकवाड, फिरोज खाँ पठान, एल.के. चंदेल, जितेंद्र चन्ने, हितेश डोंगरे, राजेश फुले, मार्कंड चौरे व कृषक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांचे
By admin | Updated: January 11, 2016 00:40 IST