शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:02 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुका कचेरीत शुकशुकाट : अनेकांना कामाविनाच परतावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात आलेल्यांना आल्यापावली गावाकडे परत जावे लागले. या आंदोलनाने जनतेची गैरसोय होणार असल्याने लवकारात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.दहावी व बारावीचे निकाल लागलेले असल्यामुुळे पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणतपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिष्यवृत्तीकरिता हलफनामा या महत्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता आहे. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आणि एक नगर पंचायत असून १०४ गावे समाविष्ट आहेत. त्यात १० रिठी आणि ९४ लोकवस्तीची असून लोकसंख्या एक लाख २८ हजार ७७६ एवढी आहे.महसूल विभागाचे कामकाज योग्य पध्दतीने व्हावे, याकरिता पाच मंडळ अधिकारी कार्यालये व ३९ तलाठी साझे आहेत. यातून जनतेच्या महसूल विषयक समस्या मार्गी लावल्या जातात. या कार्यालयाचे अधीकार क्षेत्रात नसलेली कामे याच कार्यालयाच्या कागदपत्राच्या पुराव्यावरुन तहसील कार्यालयातून केली जातात. पण महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा दहा जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.या आंदोलनाची जनतेला माहिती नसल्यामुळे तालुक्याचे ग्रामीण भागातून अनेक जण कामानिमित्त तहसील कार्यालयात आले. पण कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित होते. तथा प्रत्येक विभागाचे दर्शनी भागावर आंदोलनाच्या दिनांकाची सुचना करुन गैरसोयीबाबत जनतेस दिलगीरी व्यक्त करण्यात आली होती.नागपूर विद्यापिठाद्वारे पदवी परीक्षाचे निकाल घोषीत होणार असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हे आंदोलन दिर्घकाळ चालल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन तोडगा काढावा व जनतेची गैरसोय थांबवावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार